
इगतपुरीनामा न्यूज, दि. 24
घोटी येथील जिल्हा परिषद शाळा मुले नं. १ ह्या केंद्रशाळेत रानभाजी महोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला. राष्ट्रीय पोषण माह अंतर्गत हा रानभाजी महोत्सव साजरा करण्यात आला. ह्या महोत्सवाचे उद्घाटन इगतपुरी पंचायत समितीच्या शालेय पोषण आहार अधिक्षिका प्रतिभा बर्डे यांनी केले. त्यांनी दैनंदिन आहारात रानभाज्यांचे महत्त्व या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी तयार करून आणलेल्या विविध पाककृतीची पाहणी करतांना त्यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. ह्या कार्यक्रमाप्रसंगी मुख्याध्यापक जहीर देशमुख, शिक्षक प्रशांत गुजराथी, प्रशांत वाघ, दिलीप झुरडे, अंजना कोकणी, गोरक्षनाथ नरोडे, महिला बचत गटाच्या वंदना चव्हाण, रत्ना माळवे व पालक विद्यार्थी उपस्थित होते. ह्या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी अंजना कोकणी यांनी परिश्रम घेतले.