इगतपुरीनामा न्यूज, दि. 20
पाच दिवसापासून बेपत्ता असलेल्या युवकाचा मृतदेह सोमवारी मध्य वैतरणा धरणात आला आढळुन आला आहे. इगतपुरी शहराजवळ असणाऱ्या तळेगाव येथील हा युवक असल्याचे समजते. सुनील कुंडलिक मेंगाळ वय 24 असे युवकाचे नाव आहे. काही दिवसांपूर्वी विहिगाव जवळ त्याची मोटार सायकल रस्त्यालगत आढळून आली होती. मात्र त्याचा तपास लागत नव्हता. म्हणून कुटुंबियांनी 15 सप्टेंबरला इगतपुरी पोलीस ठाण्यात मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार दिली होती. सोमवारी 5 वाजेच्या सुमारास मासेमारी करणाऱ्यांना धरणात तरंगत असलेल्या अवस्थेत त्याचा मृतदेह आढळला. त्याच्या खिशात असणाऱ्या आधार कार्डवरून ओळख पटली आहे. याप्रकरणी पोलिसांनी कसून तपास सुरु केला आहे.