इंजि. संजय बोराडे यांना आदर्श अभियंता पुरस्काराचे वितरण

इगतपुरीनामा न्यूज, दि. 16

अभियंता दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद अभियंता संघटनेच्या वतीने जिल्हा परिषद उपविभाग इगतपुरीचे शाखा अभियंता संजय बोराडे यांना आदर्श अभियंता पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. त्यांना पुरस्कार मिळाल्याने इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर तालुक्यातून त्यांचे अभिनंदन सुरु आहे. नाशिक येथील विशाखा हॉल, कुसुमाग्रज प्रतिष्ठान येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लिना बनसोड ह्या अध्यक्षस्थानी होत्या.

पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणुन उपनौदल प्रमुख सुनिल भोकरे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. ए. टी. गुंडे उपस्थित होते. जिल्हा परिषद अभियंता संघटनेचे जिल्हाध्यक्ष इंजि. आर. एस. गरूड, सचिव इंजि. जे. डी. पाटील, जिल्हा कार्याध्यक्ष इंजि. आर. एन. पाटील यांनी हा कार्यक्रम यशस्वी केला. याप्रसंगी नाशिक जिल्ह्यातील सर्व अभियंते उपस्थित होते.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!