घोटीत सर्व कंपन्याच्या मेडिक्लेमसाठी मातोश्री हॉस्पिटलमध्ये तत्परतेने विविध आरोग्य सेवा उपलब्ध : सर्व प्रकारचे मोठे ऑपरेशन, वैद्यकीय सुविधा, जीवनदायी योजना आणि नामवंत डॉक्टरांकडून नागरिकांना मिळतात सुविधा

इगतपुरी तालुक्यात लोकांच्या विश्वासाला पात्र ठरलेले मातोश्री हॉस्पिटल

भास्कर सोनवणे : इगतपुरीनामा न्यूज, दि. ९

इगतपुरी तालुका म्हणजे दुर्गम आणि आदिवासी तालुका.. ह्या तालुक्याच्या नागरिकांना आरोग्याच्या सुविधा हव्या असतील तर थेट नाशिक गाठावे लागते. त्यामुळे आटोग्याची चिंता असणाऱ्या लोकांना आता चिंतामुक्त होण्याची संधी आहे. अनेक नागरिकांच्या विश्वासाला पात्र ठरलेल्या घोटी येथील मातोश्री हॉस्पिटलमध्ये नाशिक मुंबईमध्ये मिळणाऱ्या सर्वच आरोग्य सुविधा, मोठ्या शस्त्रक्रिया, उपचार मिळण्याची सुविधा सुरु आहे. शेकडो रुग्णांनी याचा चांगला फायदा सुद्धा करून घेतलेला आहे. आणखी महत्वाची खुशखबर म्हणजे आपल्याकडे कोणत्याही कंपनीची मेडिक्लेम पॉलिसी असली तरी त्या कंपनीच्या पॉलिसीद्वारे सर्व कॅशलेस सुविधा मातोश्री हॉस्पिटलमध्ये कार्यान्वित करण्यात आलेल्या आहेत. अतिशय अवघड असणाऱ्या अनेक आजारांच्या शस्त्रक्रिया या हॉस्पिटलमध्ये यशस्वी झाल्या असून जीवनदायी योजनेतून रुग्णांना मोफत लाभ मिळवून देण्यात आला आहे. विविध रोग आणि आजारावरील तज्ज्ञ डॉक्टरांचे पथक मातोश्री हॉस्पिटलद्वारे नागरिकांच्या सेवेत कार्यरत आहे. मग चिंता कशाला करता ? आपल्या किंवा आपल्या परिचित व्यक्तींचा कोणताही आजार, रोग, शस्त्रक्रिया, उपचार आणि देखभाल करायची असेल तर घोटी येथील मातोश्री हॉस्पिटल आपल्यासाठी 12 महिने 24 तास तत्पर सेवा द्यायला तयार आहे. गोरगरीब नागरिकांना शासकीय योजनेतून मोफत आणि दर्जेदार आरोग्य सेवा देण्यासाठी घोटीचे मातोश्री हॉस्पिटल सर्वत्र प्रसिद्ध आहे.

मातोश्री हॉस्पिटलमध्ये केशरी आणि पिवळ्या रेशनकार्डधारकांसाठी महात्मा फुले जनआरोग्य योजना, स्टार हेल्थ इन्शुरन्स, गो डिजिट इन्शुरन्स कंपनी, रिलायन्स जनरल इन्शुरन्स, नॅशनल इन्शुरन्स, फ्युचर जनराली इन्शुरन्स, कोटक महिंद्रा इन्शुरन्स, आयसीआयसीआय लोम्बार्ड इन्शुरन्स, रॉयल सुंदरम इन्शुरन्स, न्यू इंडिया इन्शुरन्स, छोला मंडलम इन्शुरन्स, निवा मॅक्स बुपा इन्शुरन्स, केअर हेल्थ इन्शुरन्स, टाटा एआयजी इन्शुरन्स, एचडीएफसी अर्गो इन्शुरन्स, युनिव्हर्सल सोम्पो हेल्थ इन्शुरन्स, इफको टोकीयो हेल्थ इन्शुरन्स, एसबीआय जनरल इन्शुरन्स, Health India Insurance TPA Services Pvt Ltd, FHPL, MD India, Medi Assist Health Care Services, Med Save India Health Care Ltd, Paramaunt Health आदी कंपन्यांच्या कॅशलेस मेडिक्लेमची सुविधा उपलब्ध आहे. महाराष्ट्र शासनाची जीवनदायी आरोग्य योजना आणि तत्सम सर्व सेवा नागरिकांसाठी 24 तास उपलब्ध असल्याची माहिती मातोश्री हॉस्पिटलच्या संचालिका डॉ. हेमलता जे. चोरडिया, डॉ. जितेंद्र चोरडिया यांनी दिली. इगतपुरी तालुक्यातील मातोश्री हॉस्पिटल हे सर्व कंपन्याची कॅशलेस सुविधा असणारे एकमेव आणि पहिले हॉस्पिटल ठरले असून गोरगरिबांच्या आरोग्य सेवेमुळे मोठी पुण्याई मिळाली असल्याचे ते म्हणाले.

मातोश्री हॉस्पिटलमध्ये सर्व रोगाचे निदान, उपचार, तपासण्या आणि शस्त्रक्रिया यांची सुविधा उपलब्ध आहे. इगतपुरी तालुक्यासह आसपासचे तालुके आणि नाशिक शहरातील हजारो रुग्णांनी मातोश्री हॉस्पिटलची आरोग्य सुविधा अनुभवली आहे. हॉस्पिटलसाठी विविध आजारांवरील उपचार आणि यशस्वी शस्त्रक्रियेसाठी सुप्रसिध्द असणारे सुपर कन्सलटंट लाभले आहेत. यामध्ये डॉ. प्रशांत नारायणराव पवार, डॉ. गौरव दिनेश बच्छाव, डॉ. विशाल प्रकाश बोथरा, डॉ. मुकेश अरुण धांडे, डॉ. जयेश प्रकाश वाघूळदे, डॉ. भूषण राजेंद्र विसपुते, डॉ. अमित राऊत, डॉ. मनोज विलास बच्छाव, डॉ. प्रतिक पवार, डॉ. सचिन देवरे, डॉ. सुदर्शन डागा, डॉ. भूषण देशमुख, डॉ. धनराज सोनार, डॉ. शीतल कुमार पाटील आदींचा समावेश आहे. यासह हॉस्पिटलसाठी कन्सलटंट असणारे तज्ज्ञ डॉक्टर्स डॉ. श्रेयस एस. शाह, डॉ. प्रीतम रत्नकांत पवार, डॉ. सुनील मारुती बुळे, डॉ. विजय विश्वनाथ घुगे, डॉ. विक्रम अशोक पडोळ, डॉ. भूषण देशमुख, डॉ. सुदर्शन डागा, डॉ. अनिल जाधव, डॉ. प्रितेश कोठारी आदी नेहमीच उपलब्ध असतात.

जबड्याच्या हाडाचे अतिशय दुर्मिळ आणि अयशस्वी होण्याची जास्त शक्यता असलेले ऑपरेशन मातोश्री हॉस्पिटलने यशस्वी करून दाखवले. हिपरिप्लेसमेंट सुद्धा यशस्वीपणे करण्यात हॉस्पिटल अग्रेसर आहे. मणक्याचे 50 पेक्षा जास्त ऑपरेशन, अतिशय अवघड आणि फक्त मुंबईसारख्या ठिकाणी होणारे मेंदूरोगाचे ऑपरेशन अर्थातच ब्रेन सर्जरीसाठी मातोश्री हॉस्पिटलने आरोग्य क्षेत्रातील उच्चतम कामगिरी करून दाखवलेली आहे. जन्मापासून मेंदूमध्ये गाठ असणाऱ्या कुर्णोली येथील रवींद्र उबाळे ह्या सामान्य कुटुंबातील रुग्णाची यशस्वीरित्या शस्त्रक्रिया होऊन त्यांचा आजार समूळ नष्ट करण्यासाठी मातोश्री हॉस्पिटलची मोठी मदत झालेली आहे. इगतपुरी तालुक्यातील पहिले डायलीसिस सेंटर, पहिले जीवनदायी योजनेचा लाभ देणारे हॉस्पिटल आणि दुर्धर आजारांचे दुर्मिळ उत्तम ऑपरेशन करणारे हॉस्पिटल म्हणून मातोश्री हॉस्पिटलने नावलौकिक मिळवलेला आहे. कोणत्याही प्रकारची वैद्यकीय मदत, सल्ला, मार्गदर्शन, उपचार, शस्त्रक्रिया, कॅशलेस मेडिक्लेम आणि जीवनदायी योजना याबाबत अधिक माहितीसाठी 9764473899, 9028399899 ह्या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आलेले आहे.

घोटीच्या मातोश्री हॉस्पिटलमध्ये यशस्वी झाली सर्वात अवघड शस्त्रक्रियाबातमी वाचा https://igatpurinama.in/archives/4479

मातोश्री हॉस्पिटलचे संचालक डॉ. जितेंद्र आणि डॉ. हेमलता चोरडिया

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!