कवी : जी. पी. खैरनार, नाशिक
९४२१५११७३७/ ७०८३२३४०२१
व्यसनमुक्ती जुगारबंदी,
फलक दिसतो पारावर !
फसवी ही सुंदोपसुंदी,
दिसते फक्त कागदावर !!
दारु, गुटखा भाव चढले,
न आले कुणी रस्त्यावर !
स्वस्त होण्या घष्टी दारु,
न बरसले सरकारवर !!
दादल्याच्या नशेपायी,
विकून खाल्लं घरदार !
मोडून पडला पहा सारा!
भरलेला सुखी संसार !!
बाप कमाईच्या पैशाने,
पोरं काढती विडी धूर !
बालपणीच पहा मातवी,
चरस गांजाचा काहूर !!
मायबाप तुम्हीच असे,
तुम्हीच आमचे सरकार !
नशा उत्पादनाची बंदी,
करण्या तुम्ही व्हा तयार !!
अफू गांजा तंबाखू पुड,
मिळते पहा ग्रॅम वर !
सोन्यापेक्षा जास्त भाव,
कमी आहे चांदी दर !!
नशेपायी पुरते झाले,
मानवा दुर्धर आजार !
कष्टकरी मानव देह,
पुरता झालासे बेजार !!
थांबवा तुम्हीच खेळणे,
मटका सट्टयाचा जुगार !
घडविण्या आदर्श पिढी,
नशा सट्टयास देऊ हार !!