प्रभाकर आवारी : इगतपुरीनामा न्यूज, दि. ७
इगतपुरी तालुक्यात खरीप हंगामातील भात पिकासह बागायती क्षेत्राला दरवर्षीच अस्मानी व सुलतानी संकटांनी ग्रासले जाते. याही वर्षी अतिवृष्टी बरोबरच जास्त हवेमुळे पिकांना मोठा फटका बसला आहे. इगतपुरी तालुक्यात शेतकऱ्यांचे यामुळे मोठे नुकसान झाले. शासनाने शेतकऱ्यांच्या पिकांचे सरसकट पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी काँग्रेसचे इगतपुरी तालुकाध्यक्ष रमेश जाधव यांनी केली आहे.
जास्त पर्जन्याचा तालुका म्हणुन इगतपुरी तालुक्याची ओळख आहे. मात्र गेल्या काही वर्षांपासून पावसाची अनियमितता तर कधी वादळी वाऱ्यासह जोरदार अतिवृष्टी होते. यामुळे शेतकऱ्यांवर दरवर्षीच दुबार पेरणी, पुनर्लागवड, महागडी खते, मजुर अशा अनेक संकटांनी पिके जगवावे लागतात. त्यातच पिकाला कवडीमोल भाव मिळत असल्यामुळे झालेला खर्चही निघत नाही. परिणामी शेतकरी मेटाकुटीला आला आहे. चालु वर्षीच्या खरीप हंगामातही याचा प्रत्यय आला. नेहमीच वादळी वाऱ्यासह बरसणाऱ्या अति जोरदार पावसाने खरीप हंगामातील भात पिकासह बागायतीक्षेत्राला याचा मोठा फटका बसला आहे. अनेक शेतांमध्ये झाडे पडल्याने तसेच अनेक शेतकऱ्यांचे बांध फुटल्याने पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर शासनाने शेतकऱ्यांच्या नुकसानग्रस्त पिकांचे सरसकट पंचनामे करून भरपाई द्यावी अशी मागणी काँग्रेसचे इगतपुरी तालुकाध्यक्ष रमेश जाधव यांनी केली आहे.
वादळी वाऱ्यासह बरसणाऱ्या पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. महागडी खते, दुबार पेरणी, पुनर्लागवड आदी संकटांनी शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. शासनाने इगतपुरी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पिकांचे सरसकट पंचनामे करून भरपाई द्यावी.
- रमेश जाधव, काँग्रेस इगतपुरी तालुकाध्यक्ष