गणपतीच्या आरासमध्ये केळीपासून बनवले सुबक मखर : कोकणस्थित शिक्षकाची गावी अफलातून आरास

निलेश काळे : इगतपुरीनामा न्यूज, दि. ६

गणेशोत्सव म्हणजे थर्माकोलने केलेली सजावट, झगमगाट असं अनेक घरांमध्ये पाहायला मिळतं. पण पर्यावरणाची पुरेपूर काळजी घेत गणेशोत्सव साजरा करणारी कुटुंबं आहेत. गणेशोत्सवात प्रत्येक भाविक वेगवेगळे देखावे व आरास करून भाविकांचे मन मोहित करून घेत असतो. कोणी विविध प्रकारची विद्युत रोषणाई तर कोणी चलचित्राचा देखावा करत असतो.

पिंपळगाव मोर येथील पेशाने शिक्षक असलेले गणेश कुंदे सातार्डा जि. रत्नागिरी येथे नोकरीस आहेत. कोकणात गणेशोत्सव मोठ्या थाटामाटात तसेच धुमधडाक्यासह जल्लोषात साजरा होतो. सिंधुदुर्गासह कोकणात वेगवेगळ्या पर्यावरणपूरक आरास केल्या जातात. घरातील कापड व घोटीव, बांबूच्या काड्या, कार्ड पेपर प्रामुख्याने वापरून मखर सजवण्यावर श्री.कुंदे यांचा भर असतो.

कोकणातल्या वेगवेगळ्या कला गावाकडे देखील भाविकांना व ग्रामस्थांना समाजाव्यात ह्या अनुषंगाने श्री. कुंदे दरवर्षी वेगळी आरास करत असतात. गणपतीसमोर सत्यानारायण पूजेवेळी तब्बल ८ तास कारागिरी करून केळीच्या पानांपासून मनमोहक आरास बनवली आहे. गावातील कलाप्रेमी व भाविकांनी आरास बघण्यासाठी गर्दी केली असून पद्धती जाणून घेतली.

गणेशोत्सव हा कोकणातील आवडता व लोकप्रिय सण असून आम्ही गणपतीला गावी पिंपळगाव येथे येतो. दरवर्षी वेगवेगळी आरास करून गावातील भाविकांना कोकणातील कलेचे दर्शन घडवून आणत असतो. प्लास्टिक थर्माकॉलचा अतिरेक करण्यापेक्षा वेगळी कला म्हणून दरवर्षी वेगळी आरास करण्याचा मानस असतो.
- गणेश कुंदे, शिक्षक, सातार्डा

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!