१० फुटी अजगराने गिळली बकऱ्यांची पिल्ले ; चिंतामणवाडी येथील घटना

इगतपुरीनामा न्यूज, दि. 25

कसारा वन परिक्षेत्रातील चिंतामण वाडी येथे महादू शंकर मांगे यांच्या बकऱ्यांच्या गोठ्यात आज सकाळी अजगर आढळून आले. या अजगराने एक शेळीच्या पिल्लाला आपला भक्ष्य बनवले होते. घरमालक महादू मांगे हे शेळ्या चारण्यासाठी गोठ्यात गेल्यावर शेळ्यांच्या माची खाली अजगर आढळून आले. अजगराने एका शेळीच्या पिल्लाला निघळले होते. दोन पिल्ले मृत अवस्थेत बाजूला पडलेली होती. सर्पमित्र वासू शिंदे यांना बोलावून हा अजगर पकडण्यात आला. वन विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने अजगराला जंगलात सोडण्यात आले. या अजगराची लांबी 10 फुट आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!