इगतपुरीनामा न्यूज, दि. 24
उत्तरप्रदेशातील मोहबा येथून मुंबई वाशी येथे पोहोचवण्यासाठी दिलेल्या 817 वाटण्याच्या गोण्यांची कंटेनर ड्रायव्हरने परस्पर विल्हेवाट लावली आहे. मुंबई आग्रा महामार्गांवर मालेगाव ते घोटी दरम्यान ही घटना घडली आहे. संपूर्ण वाटाणा गोण्यांची किंमत 16 लाख 48 हजर 843 रुपये एवढी आहे. मालेगाव येथे कंटेनरचे जीपीएस बंद करून रिकामा कंटेनर घोटी येथे उभा करून ड्रायव्हर पसार झाला आहे. न्यु गुडविल फ्राट करीयर वाशीचे मालक अरुण कुमार यादव घोटी पोलीस ठाण्यात ड्रायव्हर विरोधात फिर्याद दिली असून पोलिसांनी कलम 407 नुसार गुन्हा दाखल केला आहे.
फिर्यादी अरुण कुमार सहदेव यादव, वय 33, धंदा ट्रान्सपोर्ट, रा. एमबीएन पार्क प्लॅट नं. 5354, ऑफिस नं. 211, सेक्टर 19 ए, वाशी, नवी मुंबई यांनी त्यांचा कंटेनर क्र. एनएल 01 एबी 7851 वरील संशयित आरोपी ड्रायव्हर संजय कुमार रामबच्चन यादव रा. बिरमपुर, पो. मुक्तीगंज, ता. केरावत, जि. जैनपुर उत्तर प्रदेश याच्या ताब्यातील कंटेनरमध्ये आंबे ट्रेडर्स मोहबा युपी येथुन 817 वटाण्याचे गोणी भरुन वाशी येथे खाली करण्यासाठी विश्वासाने ताब्यात दिल्या. ड्रायव्हरने मालेगाव येथे कंन्टेनरचे जीपीएस बंद करुन मालेगाव ते घोटी दरम्यान कोठेतरी वाटाण्याचे 817 गोण्या किंमत 16 लाख 48 हजार 843 रुपये किमतीच्या स्वताच्या फायद्यासाठी कोठेतरी विल्हेवाट लावुन कंटेनर घोटी येथील वैतरणा फाटा येथे रिकामा उभा करुन पळुन गेला. म्हणुन घोटी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घोटीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संजय कवडे यांनी आपल्या पथकासह तपास सुरु केला आहे.