अर्चना पाटील यांचे सेट, नेट, सीटीईटी परीक्षेत उज्ज्वल यश

इगतपुरीनामा न्यूज, दि. 11

नाशिक येथील अर्चना चुडामन पाटील यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे घेतलेल्या राज्यस्तरीय पात्रता चाचणी ( सेट ) परीक्षेत यश मिळवले. मराठी या विषयात त्या उत्तीर्ण झाल्या असून त्यांना प्रा. देविदास गिरी व प्रा. छाया लोखंडे यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांनी यापूर्वी नेट, सीटीसी, सीटीईटी या परीक्षेत देखील यश संपादन केलेले आहे. लग्नानंतर कौटुंबिक जबाबदारी सांभाळून एमए, बीएड, सेट, नेट, सीटीसी, सीटीईटी या परीक्षांमध्ये यश मिळविलेले आहे. शिक्षण क्षेत्रातील या पदव्या मिळविल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. त्यांचे पती योगेश जगन्नाथ चौधरी यांच्या खंबीर पाठिंब्यामुळे शिक्षण घेता आल्याचे त्यांनी सांगितले. श्रीमती पाटील या नाशिक येथील न्यू कॉलेज ऑफ एज्युकेशनच्या माजी विद्यार्थीनी आहेत.

अर्चना पाटील यांचे यश प्रेरणादायी

लग्न झाल्यानंतर कौटुंबिक जबाबदारी सांभाळून आणि मधल्या काळात शिक्षणामध्ये प्रचंड खंड पडल्यानंतर आपण पुढील शिक्षण घ्यावे या जिद्दीतून अर्चना पाटील यांनी यश मिळवले. शिक्षण क्षेत्रातील या पदव्या व परीक्षांमध्ये उत्तम यश मिळविले. इतरांना देखील यातून प्रेरणा मिळेल. त्यांचे यश म्हणजे एक प्रेरणादायी बातमी आहे.
– प्रा. देविदास गिरी, उपप्राचार्य


Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!