स्वातंत्र्यदिनी उद्योजकांमधल्या तरुणाईने पूर्ण केला रक्तदानाचा संकल्प : फर्स्ट चॉईस कॉम्प्युटर्स ह्या अग्रगण्य संस्थेकडून रक्तदान शिबीर

इगतपुरीनामा न्यूज, दि. १५

फर्स्ट चॉईस कॉम्प्युटर्स या संगणक आणि सीसीटीव्ही क्षेत्रातील नाशिकमधील अग्रगण्य संस्थेच्या विभागीय कार्यालयात आज स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने संचालक सुरज विसे यांनी शिबिराच्या माध्यमातून 75 रक्तपिशव्या संकलित करण्याचा संकल्प केला होता. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत संगणक आणि सीसीटीव्ही प्रणाली क्षेत्रातील विविध मान्यवरांनी आज या शिबिराच्या माध्यमातून स्वयंस्फूर्तीने रक्तदान केले. “मल्टीसॉफ्ट”चे संचालक विशाल सैंदाणे आणि ज्ञानेश्वर पाटील हे यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. प्रामा इंडियाचे विक्री व्यवस्थापक सचिन आल्हाट यांच्यासह विजय कापडणीस, बांधकाम व्यावसायिक हर्षद बुचुडे, सागर विसे आणि त्यांचे सहकारी यावेळी उपस्थित होते.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!