कर्मयोगी प्रतिष्ठानतर्फे संस्थापक अध्यक्ष फकिरराव धांडे यांच्याकडून गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

इगतपुरीनामा न्यूज, दि. १५

पाडळी देशमुख गावातील नव युवकांना अभ्यासाची गोडी लागून आजच्या स्पर्धेच्या युगामध्ये शैक्षणिक प्रेरणा मिळावी, विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षण घेवुन आपले जीवनमान उंचावत गाव आणि देशाची सेवा करावी यासाठी कर्मयोगी प्रतिष्ठानतर्फे संस्थापक अध्यक्ष फकिरराव धांडे यांच्याकडुन विविध सामाजिक उपक्रम होत असतात. त्यानुसार दरवर्षी इयत्ता १० वी व १२ वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा स्वातंत्र्यदिनी १५ ऑगस्टला घेतला जातो. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व गुणवत्ता वााढीसाठी हे महत्वपूर्ण योगदान समजले जाते. या वर्षीही स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधुन गावातील विद्यार्थी व विद्यार्थीनींचा सत्कार सोहळा पार पडला. या कार्यक्रमासाठी गावातील सर्व जेष्ठ नागरिक, तरुण युवक वर्ग, ग्रामस्थ व विद्यार्थ्यांचे पालक उपस्थित होते. नेहमीच उपक्रमशील व समाजोपयोगी कार्य करणारे फकिरराव धांडे यांच्या सामाजिक कार्याचे सर्वत्र कौतक केले जात आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!