भीषण अपघातात मुरंबी येथील व्यक्ती गंभीर जखमी : नरेंद्राचार्य रुग्णवाहिकेमुळे वाचला जखमीचा प्राण

इगतपुरीनामा न्यूज, दि. 25

आज सायंकाळी 7 वाजता गोंदे औद्योगिक वसाहतीजवळ व्हिटीसी फाट्यावर नाशिकहुन इगतपुरीच्या दिशेने जाणाऱ्या कंटेनर आणि मोटारसायकलचा अपघात झाला. यामध्ये मुरंबी ता. इगतपुरी येथील जखमीचे नाव योगेश पंढरीनाथ शिंदे वय 45 हे गंभीर जखमी झाले आहेत. जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थान नानिज धाम मोफत रुग्णवाहिकेचे रुग्णमित्र निवृत्ती पाटील गुंड यांना माहिती समजताच ते समयसुचकतेने हजर झाले. त्यांनी अपघातस्थळी दाखल होऊन जखमीला नाशिकच्या खासगी रुग्णालयात दाखल केले. अपघाताची भीषणता पाहता योगेश शिंदे यांचा पुनर्जन्म झाला अशी प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली. नरेंद्राचार्य रुग्णवाहिकेने केलेल्या मदतीमुळे जखमीला वेळेत उपचार मिळाल्याने त्यांचा जीव बचावला.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!