इगतपुरीनामा न्यूज, दि. १५
अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिनाच्या मंगल पर्वावर रूंजाजी आबाजी पाटील धांडे यांनी त्यांच्या पत्नी स्व. जाईबाई रूंजाजी धांडे यांच्या स्मृती पित्यर्थ पाडळी देशमुख जिल्हा परिषद शाळेला संगणक संच भेट दिला. संगणक संचामुळे शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक अभ्यासासाठी मोठी मदत मिळणार आहे. विद्यार्थ्यांच्या विकासात यामुळे मोठी भर पडणार असल्याने विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त केला.
रुंजाजी धांडे आणि त्यांच्या कुटुंबियांचा आज खरोखर अभिमान वाटतो. त्यांना आपल्या जन्मभूमी बद्दल असलेला जिव्हाळा व आदर या भावनेतून त्यांनी शाळेतील मूलांना दिलेली भेटवस्तु ही विद्यार्थ्यांना शैक्षणिक जीवनासह विज्ञान युगात प्रोत्साहन देणारी आहे. त्याचा सर्व विद्यार्थ्यांनी योग्यरित्या विनीयोग करावा अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली. कार्यक्रमावेळी गावातील जेष्ठ नागरिक, युवक, महिला आणि ग्रामस्थ हजर होते. या मदतीबद्धल शिक्षकांनी रुंजाजी धांडे यांचे आभार मानले.