इगतपुरीनामा न्यूज, दि. १५
पिंपळगाव मोर येथे स्वतंत्र भारताचा अमृतमहोत्सव विविध कार्यक्रमांचे आयोजन करून साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या घोषणांनी गावाचा परिसर दुमदुमून गेला होता. जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सोसायटीचे माजी चेअरमन पंढरीनाथ काळे यांनी पालकत्व गमावलेल्या अनाथ मुलांना आणि इयत्ता पहिली ते सातवीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना शालेय दप्तर वाटप करण्यात आले. गुणवंत विद्यार्थांना कौतुकाची थाप देवून पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या. ज्या शाळेत अक्षर ओळख आणि अंकमोड शिकलो त्या शाळेतील शिक्षकांचा स्वातंत्र्यदिनी सत्कार करून ऋणात उतराई होण्याचा प्रयत्न केला. शिक्षकांच्या ज्ञानार्जनामुळेच आज आपण प्रगती करून समाजात उच्च स्तरावर पोहोचू शकतो. शाळेशी व गुरुजनांप्रती असलेली नाळ कायम ठेवत ऋणानुबंध जपून शाळेप्रती बंध यापुढेही कायम राहणार आहे. शाळेसह विद्यार्थ्यांसाठी सर्वतोपरी मदत करण्यास कायम तत्पर राहणार असल्याचे पंढरीनाथ काळे यांनी मनोगतात सांगितले.
ग्रामपंचायतीचे ध्वजारोहण सरपंच हिराबाई गातवे यांनी तर जिल्हा परिषद शाळेत शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष संजय बेंडकोळी यांच्या हस्ते करण्यात आले. ध्वजपूजन माजी चेअरमन पंढरीनाथ काळे, माजी उपसरपंच संपतराव कदम यांनी केले. टाकेदच्या महसूल मंडळ अधिकारी रूपाली सावळे, तलाठी संदीप कडनोर, वर्षा देशमुख, सचिन कराटे, मुख्याध्यापक रवींद्र साळुंखे, काशिनाथ भोईर, पोपट चव्हाण, तुकाराम लांघी, एच. के. साबळे, अर्चना दळवी, प्रज्ञा मोरे, सुरेखा दळवी, माजी चेअरमन पंढरीनाथ काळे आदी उपस्थित होते. ग्रामपंचायत सदस्य जगदीश शिंदे, कमल कदम, सुमन गातवे, संपत कदम, मुरलीधर गातवे, सुदाम कदम, शालेय व्यवस्थापन समिती सदस्य उपस्थित होते. सूत्रसंचालन पोपट चव्हाण यांनी तर आभार काशिनाथ भोईर यांनी व्यक्त केले.