आणखी १ बिबट्या अडकला पिंजऱ्यात ; इगतपुरी वन विभागाच्या कारवाईला मिळाले यश : घटनास्थळी विनाकारण गर्दी केल्यास कायदेशीर कारवाई होणार

इगतपुरीनामा न्यूज, दि. ११

आज पहाटे इगतपुरी शहरात १ बिबट्या पिंजऱ्यात अडकल्याने समाधानाचे वातावरण असतांना सायंकाळी पुन्हा आनंदाची बातमी आली आहे. वन विभागाने लावलेल्या दुसऱ्या पिंजऱ्यात पुन्हा एक बिबट्या जेरबंद झाला आहे. आजच २ बिबटे अडकल्याने नागरिकांनी आनंद व्यक्त केला. दरम्यान घटनास्थळी इगतपुरी शहरातील कोणीही नागरिकांनी अजिबात गर्दी करू नये. गर्दीमुळे बिबट्या हिंस्त्र होऊ शकतो. यासह बिबट्या पाहण्यासाठी गर्दी करणाऱ्या नागरिकांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे इगतपुरीचे वन परिक्षेत्र अधिकारी केतन बिरारीस यांनी म्हटले आहे. इगतपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस पथक घटनास्थळी आले असून नागरिकांना बाहेर काढले जात आहे. वन परिमंडळ अधिकारी भाऊसाहेब राव, वनरक्षक फैजअली सय्यद यांनी वन परिक्षेत्र अधिकारी केतन बिरारीस यांच्या मार्गदर्शनाखाली लावलेल्या सापळ्यात आजच २ बिबटे अडकल्याने इगतपुरी शहरातील नागरिकांनी आभार मानले आहेत. वनरक्षक जी. डी. गांगुर्डे, सुरेखा गृहाडे, जाधव भाऊसाहेब, मुज्जू शेख, ग्रामस्थ दिनेश कोलंमकर, सचिन यादव, अनिकेत यादव, नाना शिरोळे यांनीही ह्याकामी परिश्रम घेतले.

पहिला बिबट्या सापडल्याची संबंधित बातमी खालील लिंकवर क्लिक करून वाचता येईल.

https://igatpurinama.in/archives/6208

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!