इगतपुरीनामा न्यूज, दि. २२
25 जिल्हा परिषदा आणि 284 पंचायत समित्यांच्या आरक्षण सोडतीचा बिगुल वाजला आहे. इच्छुकांच्या आशा पल्लवीत झाल्या असल्या असून ओबीसी आरक्षणाचा विषय सर्वोच्च न्यायालयात मार्गी लागला आहे. आरक्षण सोडत काढतांना ओबीसी आरक्षण सुद्धा काढण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेच्या गटांसाठी प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हाधिकारी आणि पंचायत समित्यांच्या गणांसाठी त्या त्या तालुक्यातील तहसीलदार आरक्षण सोडत काढणार आहेत. प्रत्येक तालुक्यातील आरक्षणावर उपजिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात येणार आहे. त्यानुसार २८ जुलैला आरक्षण सोडत कार्यक्रम होणार असल्याचा निर्णय राज्य निवडणूक आयोगाने घेतला आहे. एकंदरीत सर्वांगीण विचार करता सप्टेंबर महिन्याच्या १० तारखेनंतर केव्हाही निवडणुका होणार असल्याची दाट शक्यता आहे. आरक्षण सोडत निघणार असल्यामुळे सर्व राजकीय पक्ष, इच्छुक उमेदवारांसह संपूर्ण राज्याचे लक्ष सोडतीकडे लागले आहे.