इगतपुरीनामा न्यूज, दि. २१
इगतपुरी तालुक्यातील आदर्श गाव मोडाळे येथे क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले अभ्यासिकेचा लोकार्पण सोहळा छत्रपती शिवाजी महाराजांचे तेरावे वंशज तथा स्वराज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष युवराज संभाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते होणार आहे. शुक्रवारी २९ जुलैला मोडाळे येथे सकाळी ११ वाजता हा भव्य लोकार्पण सोहळा होणार असल्याची माहिती जिल्हा नियोजन समिती सदस्य गोरख बोडके, रोटरी क्लबचे अध्यक्ष धनंजय बेळे यांनी दिली. इगतपुरी त्र्यंबकेश्वरचे आमदार हिरामण खोसकर, मराठा क्रांती मोर्चाचे नेते करण गायकर, सिन्नर येथील गारगोटी संग्रहालयाचे संचालक के. सी. पांडे यावेळी उपस्थित राहणार आहेत. विविध स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून अखंडित अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही अभ्यासिका मोफत खुली असणार आहे. इगतपुरी तालुक्यातील अभ्यासू आणि होतकरू विद्यार्थ्यांना ह्या अभ्यासिकेद्वारे निवृत्त अधिकाऱ्यांचे मौलिक मार्गदर्शन लाभणार आहे. इगतपुरी तालुक्यातील विद्यार्थ्यांना सुसज्ज अभ्यासिकेद्वारे फायदा होणार आहे. लोकार्पण सोहळ्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.