इगतपुरीनामा न्यूज, दि. ९
नाशिक सायकलिस्ट फाउंडेशन ही नाविन्यपूर्ण उपक्रम करणारी संस्था म्हणून प्रसिध्द आहे. यामुळेच नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनचा महाराष्ट्रभर नावलौकिक आहे. मदर्स डे निमित्त शनिवारी 100 किमी व 50 कि. मी. नाईट NRM राईडचे आयोजन करण्यात आले होते. राईड प्लॅग ऑफसाठी ज्येष्ठ सदस्या एवरग्रीन सायकल हीच ओळख असणाऱ्या कल्पना कुशारे, सरोज वानखेडे, डॉ. मनिषा रौंदळ, नलिनी कड, चंद्रकांत नाईक, रविंद्र दुसाने यांच्या हस्ते राईडला प्लॅगऑफ करण्यात आला.
हु NRM राईड अगदी तंत्रशुद्ध पद्धतीने आयोजित करण्यात आली होती. या सायकलिस्टचा रूट नाशिक ते घाटनदेवी व पुन्हा नाशिक असा नाईट राईडर्सचा प्रवास होता. राईड दरम्यान प्रचंड एलिवेशन होते. रात्र झाली तरी वातावरणात प्रचंड उष्मा होता. घोटी ते घाटनदेवी हा रूट संपूर्ण चढउताराचा आहे. सरावासाठी खूप उत्तम रूट असुन रायडर्स यांची भरपूर दमछाक झाली. सर्वच रायडर्स यांनी निर्धारित वेळेच्या आधी राईड यशस्वीपणे पूर्ण केली. सर्व रायडर्स यांना अध्यक्ष राजेंद्र वानखेडे, उपाध्यक्ष किशोर माने यांच्या हस्ते मेडल व प्रमाणपत्र देण्यात आले. मेडल व प्रमाणपत्र मिळाल्यानंतर थकलेल्या रायडर्स यांच्या चेहऱ्यावर एक वेगळीच ऊर्जा चमकत होती.
नाशिक सायकलिस्ट फाउंडेशन यांची NRM संकल्पना रायडर्स यांचा आत्मविश्वास वाढावा, स्पीड वाढावा व आपला नाशिक सायकलिस्ट पुढच्या मोठ्या राईडसाठी तयार करण्याचा उद्देश आहे. NRM स्पर्धा नसून निर्धारित वेळेत राईड पूर्ण करण्याचे बंधन असते. म्हणून पुढच्या राईडसाठी मोठ्या संख्येने रायडर्स सज्ज असतात. NRM राईडसाठी टीम प्रमुख किशोर काळे, संजय पवार, रोहिणी भामरे, सचिन नरोटे, प्रविन पवार आदींनी विशेष परिश्रम घेतले.