इगतपुरीनामा न्यूज, दि. ५
इगतपुरी तालुक्यातील अत्यंत महत्त्वाच्या असणाऱ्या अडसरे बुद्रुक आदिवासी विविध कार्यकारी सेवा संस्थेच्या संचालक मंडळाची निवडणूक सुरू आहे.१३ संचालकांच्या जागेसाठी असलेल्या निवडणूक प्रक्रियेत आज झालेल्या माघार प्रक्रियेनंतर २ संचालक बिनविरोध निवडून आले आहेत. निवडणूक निर्णय अधिकारी व्ही. बी. नढे यांनी घोषित केले. उर्वरित ११ जागांसाठी २१ उमेदवार उभे असून त्यात सरळ लढती होणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.
बिनविरोध निवड झालेल्या उमेदवारांत भटक्या विमुक्त जाती राखीव जागेवर एकनाथ परदेशी तर इतर मागास प्रवर्ग राखीव गटातून किशोर परदेशी हे दोन संचालक बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले. त्यांच्या निवडीचे अडसरे बुद्रुक व टाकेद बुद्रुक ग्रामस्थांसह क्षत्रिय परदेशी समाजाने स्वागत करून अभिनंदन केले आहे.