लक्ष्मण सोनवणे । इगतपुरीनामा न्यूज, दि. २३
जन्म मृत्यू आपल्या हातात नाही. प्रत्येकाला एक दिवस मृत्यूचा सामना करावाच लागतो. साधूची संगत परमेश्वराकडे जाण्याचा एकमेव मार्ग असून, भगवंत मालक आहे. त्याच्या प्राप्तीसाठी अखंड चिंतन करावे असे प्रतिपादन गाथामुर्ती हभप मनोहर महाराज सायखेडे यांनी केले. इगतपुरी तालुक्यातील बेलगाव कुऱ्हे येथे कै. बबनराव वाळू गुळवे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त सत्संग संगीत प्रवचनात ते बोलत होते.
बेलगाव कुऱ्हे येथील बबनराव गुळवे यांच्या संस्कारातून अनेक चांगली कर्मे झाली आहेत. त्यांचे नातू नंदराज गुळवे हे शिक्षक आहेत तर सुनबाई शुभांगी गुळवे ह्या सरपंच आहेत. पितरांचा उद्धार करण्यासाठी सत्कर्म व्हावीत असेही ते म्हणाले. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य संदीप गुळवे, पांडुरंग शिंदे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रमेश जाधव, माजी सरपंच राजाराम गुळवे, उत्तम महाराज गुळवे, दादा मालुंजकर, गेणू गुळवे, विष्णुपंत गुळवे, उत्तम गोवर्धने, कारभारी ठाणगे, पोपट गुळवे, रामभाऊ गुळवे, हिरामण गुळवे, योगेश महाराज सायखेडे, तबलावादक शुभम भगत आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. आभार उत्तम महाराज गुळवे यांनी मानले.