गोंदेदुमाला औद्योगिक वसाहत ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी शोभा राजेंद्र नाठे यांची बिनविरोध निवड

इगतपुरीनामा न्यूज, दि. २३

विविध कारखाने आणि मोठी औद्योगिक वसाहत असणाऱ्या इगतपुरी तालुक्यातील महत्वपूर्ण गोंदे दुमाला ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदाची निवडणूक आज पार पडली. उपसरपंच पदावर शोभा राजेंद्र नाठे यांची बिनविरोध निवड झाली। २०१९ मध्ये झालेल्या निवडणुकीत माजी सरपंच गणपत जाधव यांच्या नेतृत्वाखालील पॅनलने बहुमत मिळवले होते. लोकनियुक्त सरपंचपदावर शरद सोनवणे यांनी निवड झाली होती. मात्र निवडून आलेल्या सर्व सदस्यांना ग्कामकाजाचा प्रत्यक्ष अनुभव यावा म्हणून प्रत्येकी १० महिन्यासाठी उपसरपंच पदासाठी सर्वानुमते रोटेशन ठरवण्यात आले. ह्या रोटेशनानुसार सीताबाई नाठे, परशराम नाठे, कचरू धोंगडे यांनी उपसरपंच पदावर कार्य केले. ठरल्याप्रमाणे उपसरपंच पदाची जागा रिक्त झाल्याने आज उपसरपंच पदासाठी सरपंच शरद सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली उपसरपंच पदाची निवडणूक घेण्यात आली. ह्या पदासाठी शोभा राजेंद्र नाठे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे घोषित करण्यात आले. घोषणा होताच ग्रामस्थांनी गुलाल आणि फटाक्यांची आतषबाजी करून जल्लोष केला. ग्रामस्थांनी निवडीचे स्वागत केले आहे.

माजी सरपंच तथा ग्रामपंचायत सदस्य गणपत जाधव, कचरू धोंगडे, परशराम नाठे, सीताबाई नाठे, कृष्णा सोनवणे, लिलाबाई नाठे, दीपिका नाठे, वैशाली नाठे, सविता नाठे, शिवानंदबाबा बेंडकुळे, ग्रामविकास अधिकारी विजयराज जाधव, लिपिक सुनील नाठे, गणेश शेळके आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. गोंदे दुमाला सोसायटीचे चेअरमन शांताराम जाधव नाठे, व्हॉइस चेअरमन रामदास नाठे, संचालक विजय नाठे, रमेश जाधव, राजाराम धोंगडे, विजय नाठे, हरिश्चंद्र बाबुराव, हरिश्चंद्र संतु नाठे, राजाराम नाठे, अंजना नाठे, अंजना खरोटे, दौलत सोनवणे, सचिव प्रमोद कहांडोळ आदींनी नवनियुक्त उपसरपंच शोभा नाठे यांचे अभिनंदन केले आहे.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!