शिवशंभु ऐतिहासिक परीक्षेत शिवव्याख्याते समाधान हेंगडेपाटील यांचे यश

इगतपुरीनामा न्यूज, दि. १६

छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज आणि महाराष्ट्रातील गडकिल्ले यांचा इतिहास समाजाच्या मनामनात रुजावा. त्यातून तरुणाईत ऊर्जा निर्माण व्हावी या हेतूने स्वराज्य प्रतिष्ठान हिंदुस्थान संचलित आळंदी ते किल्ले श्री रायगड पालखी सोहळा समितीच्या माध्यमातून ऑक्टोबरमध्ये शिवशंभु ऐतिहासिक लेखी परीक्षेचे आयोजन केले होते. ह्या परीक्षेत महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यांमध्ये ५० परीक्षा केंद्रांवर परीक्षा घेण्यात आली. यामध्ये १३ वर्षातील  विद्यार्थ्यांचा लहान गट तर वय वर्षे १३ पासून वय वर्ष १०० पर्यंत मोठा गट अशा दोन गटांमध्ये परीक्षेचे विभाजन करण्यात आले होते. या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे.

नाशिक जिल्ह्यातून मोठ्या गटांमध्ये प्रथम क्रमांक नितेश सुरेश शर्मा, द्वितीय क्रमांक शिवव्याख्याते समाधान हेंगडे पाटील, तृतीय क्रमांक मानसी विकास गायधनी यांनी यश संपादन केले. लहान गटांमध्ये प्रथम क्रमांक स्वामी नितेश शर्मा, द्वितीय क्रमांक सात्वीकी संदीप डेर्ले, तृतीय क्रमांक तिर्था मनोज जाधव यांनी मिळवला. गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा दिनांक १३ फेब्रुवारीला पार पडला. या परीक्षेमध्ये नाशिक जिल्ह्यातून शिवव्याख्याते समाधान हेंगडे पाटील यांनी द्वितीय क्रमांक मिळवला तर महाराष्ट्र राज्यातून नववा क्रमांक मिळवला आहे. समाधान हेंगडे पाटील हे गेल्या आठ वर्षापासून शिवचरित्राचा अभ्यास करत आहे. महाराष्ट्रासह गुजरात राज्यातही त्यांनी शिवचरित्र आणि महापुरुषांची विचारधारा या विषयावर अनेक व्याख्याने दिलेली आहे. शिवव्याख्याते समाधान हेंगडे पाटील म्हणाले की अशा परीक्षांचे आयोजन आज होणे गरजेचे आहे. त्या माध्यमातून खऱ्या अर्थाने शिवाजी महाराजांच्या विचारांचे संस्कार आज तरुण पिढी वर रुजले जातील. त्यातून सक्षम नागरिक घडवण्यासाठी मोलाची मदत होईल. त्याचबरोबर परीक्षेचे आयोजन करणाऱ्या स्वराज्य प्रतिष्ठान हिंदुस्थान संचलित आळंदी ते किल्ले रायगड पालखी सोहळा समितीचे विशेष आभार मानले.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!