टाकेघोटीच्या प्रभारी सरपंचपदी मच्छिंद्र दोंदे यांची वर्णी

सुनील शिंदे : इगतपुरीनामा न्यूज, दि. १७

टाके घोटी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासाठी नुकतीच निवड प्रक्रिया राबविण्यात आली. सरपंचपद आदिवासी महिला राखीव असल्याने या पदासठी एकही उमेदवारी अर्ज दाखल न झाल्याने उपसरपंच असलेले मच्छिंद्र दोंदे यांच्यावर प्रभारी सरपंचाची धुरा सोपविण्यात आली. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मंडळ अधिकारी जयंत संसारे, सहाय्यक अधिकारी संदीप दराडे यांनी काम पाहिले. तलाठी राम तौर यांनी सहकार्य केले.

सकाळी दहा ते दुपारी दोनपर्यंत ही निवडणूक प्रक्रिया पार पडली. दुपारी तीनला उपसरपंचपदी दोंदे यांच्या नावाची घोषणा झाली. यावेळी ग्रामपंचायत सदस्य शोभा दुभाषे, धर्मराज आडोळे, भिका पवार, सुनील पवार आदी ग्रामपंचायत सदस्यांसह ग्रामसेवक चेतन पवार, माजी सरपंच भगीरथ भोर, ज्ञानेश्वर आडोळे, सतीश दोंदे, अण्णासाहेब दोंदे, राहुल दोंदे, भाऊराव दोंदे, सुधाकर दोंदे, मिलिंद दोंदे, भाऊ वाघ व ग्रामस्थ उपस्थित होते. दोंदे यांच्या निवडीबद्दल ग्रामपंचायत सदस्य संघर्ष संघटनेच्या वतीने त्यांचा घोटी येथे सत्कार करण्यात आला. यावेळी अनिल उन्हवणे, सुनील पालवे, संजय शिंदे, राहुल जगताप आदी उपस्थित होते.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!