लक्ष्मण सोनवणे : इगतपुरीनामा न्यूज, दि. ३०
शिवाजी महाराजांच्या अनेक गड किल्ल्यांचे अस्तित्व जतन केले आहेत. त्यांच्या काळातील शिलेदार वास्तू अजुनही साक्षीदार असल्यातरी आजमितीस त्या स्वच्छताविना दुर्लक्षित मात्र नक्कीच नाही. महाराष्ट्रातील इतिहासकालीन गड किल्ल्यांची माहिती घेऊन तेथील साफसफाई करण्यासाठी शिवदुर्ग संवर्धन भ्रमंती संस्थेचे हात सरसावले आहेत. संस्थेचे युवक नेहमीच किल्ल्यांवरील साफसफाई करण्यासाठी प्रयत्नशील असतात. अत्यंत गुलाबी थंडीच्या वातावरणात त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हरिहर किल्ल्याची यशस्वी चढाई करून शिवदुर्ग संवर्धन भ्रमंती संस्थेचे चोविसावे दुर्ग संवर्धन मोहिम किल्ले हरिहर येथे नुकतेच पार पडले. त्र्यंबकेश्वर पासून 15 किमी अंतरावर असलेल्या किल्ला हरिहर येथे शिवदुर्ग संवर्धन भ्रमंती संस्थेच्या मावळ्यांनी किल्ल्यावरील सैनिकांचे जोते किल्लेदाराच्या वाड्याचे अवशेष व्यवस्थित जतन करून चबुतऱ्यावर मांडण्यात आले. त्यात उगलेले काटेरी झाडेझुडपे तोडून सैनिकांचे जोते स्वच्छ करून आजूबाजूचा परिसर निर्माण करण्यात आला. पाण्याच्या टाक्यात पडलेले प्लास्टिकचे ग्लास पत्रावळी काढून टाक्या स्वच्छ करण्यात आल्या. मोहीम यशस्वी करण्यासाठी सप्नील दाते, आकाश सरोदे, मोनु दाते, राहुल दाते, गोरख जमधडे, अनिल दाते, संतोष मिंदे, बाळू शिंदे, लखन पाळदे, शिवराज मिंदे, शुभम जमधडे, अनुराग रहाडे, रोशन गोवर्धने आणि शाम गव्हाणे यांनी परिश्रम घेतले.