दिव्यांगांच्या विविध मागण्यांसाठी प्रहार दिव्यांग संघटनेचे विविध अधिकाऱ्यांना निवेदन

इगतपुरीनामा न्यूज, दि. २९

प्रहार दिव्यांग संघटना इगतपुरी तालुका यांच्या वतीने आज दिव्यांग बांधवांच्या विविध समस्या सोडवण्याबाबत जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा पुरवठा अधिकारी जिल्हा शल्य चिकित्सक यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. इगतपुरी तालुक्यातील दिव्यांग बांधवांना भेडसावणाऱ्या समस्या लवकरात लवकर सोडवण्यासाठी निवेदनात नमूद केले आहे. दिव्यांग कुटुंबास स्वतंत्र अंत्योदय शिधापत्रिका देण्यात यावी, शासकीय मेळावा घेऊन ज्या दिव्यांग कुटुंबास अंत्योदय शिधापत्रिकेचे गरज आहे अशा दिव्यांग बांधवांना शिधाप्तरीक उपलब्ध करून देण्यात यावी, इगतपुरी तालुक्यातील ज्या शासकीय कार्यालयात रॅम्प अथवा लिफ्ट नाही अशा शासकीय कार्यालयात व्यवस्था करावी, सिव्हिल सर्जन यांनी लवकरात लवकर तालुका स्तरावर मेळावा आयोजित करुन दिव्यांग प्रमाणपत्र वितरित करावे, ज्या ग्रामपंचायत, ग्रामपालिका यांनी अद्याप दिव्यांग ५% निधी खर्च केला नाही असे ग्रामसेवक, ग्रामपंचायत कार्यालय यांच्यावर कठोर कारवाई करून त्यांचा विकास निधी थांबवावा, तहसील कार्यालय आवारात शासकीय कामात पारदर्शकता आणावी, तहसील व पंचायत समिती यांनी महिन्यांतुन एक बैठक आयोजित करुन दिव्यांग बांधवांना भेडसावणाऱ्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करावा,  दिव्यांग बांधवांना राजकीय क्षेत्रात आरक्षण द्यावे, केंद्र सरकारने दिव्यांग बांधवांच्या हितासाठी UID Card तयार केले आहे त्या कामात पारदर्शकता आणावी, केंद्र व राज्य शासनाचे पेन्शन अनुदान महिन्याच्या पहिल्या आठवड्यात वर्ग करावे, पेन्शन मध्ये भरघोस वाढ १ हजार वरुन ३ हजार प्रती महिना वाढ करावी, घोटी मार्केट कमिटीतुन दिव्यांग बांधवांना ५% निधी उपलब्ध करून द्यावा आदी मागण्या निवेदनात नमूद आहे. यावेळी प्रहार दिव्यांग संघटनेचे इगतपुरी तालुकाध्यक्ष नितीन गव्हाणे पाटील, उपाध्यक्ष सोपान परदेशी, प्रसिद्धी प्रमुख मंगेश शिंदे, अनिल कोरडे, सुनील पगारे, रुपचंद भागडे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!