
सुनील बोडके : इगतपुरीनामा न्यूज, दि. २२
त्र्यंबकेश्वर तालुका मराठी पत्रकार संघाच्या तालुकाध्यक्षपदी राहुल बोरसे, कार्याध्यक्षपदी मोहन देवरे तर सरचिटणीसपदी उमेश सोनवणे यांची बिनविरोध निवड झाली आहे. नाशिक जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या त्र्यंबकेश्वर शाखेची द्विवार्षिक निवडणूक बिनविरोध पार पडली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जिल्हाध्यक्ष अण्णासाहेब बोरगुडे व खजिनदार विजय बोराडे यांनी कामकाज पाहिले. यावेळी संदीप बत्तासे व विद्यमान तालुकाध्यक्ष उमेश सोनवणे उपस्थित होते. संदीप बत्तासे यांनी स्वागत व बैठकीचे सुत्रसंचालन केले. यावेळी झालेल्या निवडणूकीत त्र्यंबकेश्वर तालुका मराठी पत्रकार संघाची बिनविरोध निवडून आलेली नुतन कार्यकारणी घोषित करण्यात आली. सर्वांची निवड घोषित झाल्यानंतर जिल्हाध्यक्ष आण्णासाहेब बोरगुडे व खजिनदार विजय बोराडे यांचे हस्ते नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
निवड करण्यात आलेली कार्यकारिणी
तालुकाध्यक्ष : राहुल बोरसे
कार्याध्यक्ष : मोहन देवरे
उपाध्यक्ष : पांडुरंग दोंदे व मिलिंद तिवडे
सरचिटणीस : उमेश सोनवणे
सहसरचिटणीस : पोपट महाले
खजिनदार : देवेंद्र महाले
सहखजिनदार : ज्ञानेश्वर मेढे-पाटील
संघटक : सुनील बोडके
सहसंघटक : राकेश पाटील
समन्वयक : वसंतराव तिवडे
कार्यकारिणी सदस्य : स्वप्नील पाटील, गोकुळ पवार, तुकाराम रोकडे