तुकाराम रोकडे : इगतपुरीनामा न्यूज, दि. ६
भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल आदरभाव व्यक्त करण्यासाठी देवगांव येथील चिमुकल्यानी त्यांच्या ६५ व्या महापरिनिर्वाणदिनी अनोखे अभिवादन करून आदरांजली अर्पण केली. यावेळी विजेचा पुरवठा खंडित झाला मात्र अंधारमय वातावरणात अंधारातून प्रकाशाकडे कार्यक्रम नेण्याचा प्रयत्न चिमुकल्यांनी केला. महामानवाचे विचार खेड्यातपाड्यात पोहचत आहेत. ” जिथे गाव आहे, तिथे भीमराव आहे ” या उक्तीप्रमाणे बाबासाहेबांचे विचार अखंडित राहण्याकरिता व त्यांच्या विचार जनमानसात पेरून प्रत्येकाने आचरण करावे. या उद्देशाने त्यांनी समस्त बहुजन समाजाला अन्यायाच्या अंधकारातून मुक्त करत न्यायाच्या प्रकाशात आणण्याचे काम केले. त्यांच्यावरील आदरभाव व्यक्त करण्यासाठी चिमुकल्यांनी अभिवादन कार्यक्रम आयोजित केल्याचे सांगितले. यावेळी लहान मुलांनीच सर्व कार्यक्रमाचे नियोजन करून लहान थोरांस संबोधित केले. यावेळी मुलांच्या कार्यक्रमाचे शिस्तबद्ध नियोजनाचे कौतुक मोहिते महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. तुकाराम रोकडे यांनी केले. यावेळी सुगंधाबाई दोंदे, सावित्रीबाई दोंदे, सुनीता दोंदे, गोटीराम दोंदे, पांडुरंग दोंदे, संपत दोंदे, नंदकुमार दोंदे, माया दोंदे, रविना दोंदे, दीक्षा दोंदे, कोमल दोंदे, नयन आव्हाड, समीर दोंदे, सिद्धांत रोकडे, प्रज्ञा आव्हाड, साधना दोंदे, समृद्धी रोकडे, आदर्श शिंदे, आदेश दोंदे, संघर्ष दोंदे, मयांक दोंदे, प्राची दोंदे आदींनी बाबासाहेबांबाबत मनोगते व्यक्त करून अभिवादन केले.