इगतपुरीनामा न्यूज, दि. १
स्वच्छ सर्वेक्षण अभियानात सर्वांनी सहभागी होऊन आपल्या नाशिक जिल्ह्याला प्रथम मानांकन मिळण्यासाठी महाविद्यालयातील युवकांनी जनजागृती करणे आवश्यक आहे. महामारीच्या काळात स्वच्छतेचे महत्त्व समाजाला पटवून देण्याचे कार्य करणे हे आपले राष्ट्रीय कर्तव्य आहे असे प्रतिपादन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. आर. भाबड यांनी केले.
इगतपुरी येथील कर्मवीर पुंजाबाबा गोवर्धने कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात इगतपुरी तालुका शिक्षण विभागाच्या वतीने आयोजित केलेल्या स्वच्छ सर्वेक्षण अभियान आणि माझी वसुंधरा प्रकल्पाच्या जनजागृती निमित्ताने कार्यक्रमात प्राचार्य डॉ. भाबड बोलत होते. याप्रसंगी इगतपुरी तालुक्याचे शिक्षण विस्तार अधिकारी आर. पी. नेरे, घोटी केंद्राचे केंद्रप्रमुख अकबर शेख, उपप्राचार्य प्रा. देविदास गिरी उपस्थित होते.
प्राचार्य डॉ. पी. आर. भाबड आपल्या भाषणात पुढे म्हणाले की आज महाविद्यालयीन युवकांनी समाजासाठी कार्य करणे गरजेचे असून सामाजिक बांधिलकी मानून राष्ट्रीय उपक्रमात आपला सहभाग नोंदविणे काळाची गरज आहे. याप्रसंगी शिक्षण विस्तार अधिकारी आर. पी. नेरे, घोटीचे केंद्रप्रमुख अकबर शेख यांनी स्वच्छ सर्वेक्षण अभियान व माझी वसुंधरा अभियानाची माहिती विद्यार्थ्याना दिली.
प्रारंभी कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. देविदास गिरी यांनी केले. प्राचार्य डॉ. पी. आर. भाबड यांच्या हस्ते प्रमुख पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. जी. एस. लायरे यांनी तर आभार प्रदर्शन प्रा. यू. एन. सांगळे यांनी केले. कार्यक्रमाला प्रा. एस. एस. परदेशी, प्रा. डॉ. पी. एस. दुगजे, प्रा. व्ही. डी. दामले, प्रा. डॉ. एस. बी. पाटील, प्रा. एच. आर. वसावे, प्रा. यू. एन. सांगळे, प्रा. डी. के. भेरे, प्रा. बी. एस. महाले, प्रा. के. एम. वाजे, प्रा. एल. सी. देवरे, प्रा. सी. डी. चौधरी, प्रा. के. पी. बिरारी, प्रा. एस. एम. पवार, प्रा. डॉ. एम. बी. कांबळे, प्रा. एस. के. शेळके, प्रा. जे. आर. भोर विद्यार्थी उपस्थित होते.