इगतपुरी महाविद्यालयात आयसीएमएस ट्रेनिंग संस्थेतर्फे परिसर मुलाखतीचे ऑनलाईन आयोजन

इगतपुरीनामा न्यूज, दि. १

इगतपुरी येथील कर्मवीर पुंजाबाबा गोवर्धने कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात पुणे येथील आयसीएमएस ट्रेनिंग संस्थेतर्फे परिसर मुलाखतीचे ऑनलाईन आयोजन करण्यात आले. मुंबई आणि गोवा येथील विमानतळावर बँक ऑफिसमधील नोकरीसाठी महाविद्यालयातील विद्यार्थ्यानी मुलाखती दिल्या.

परिसर मुलाखतीच्या कार्यक्रमाचे उदघाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. आर. भाबड यांच्या उपस्थितीत  करण्यात आले. प्राचार्य डॉ. भाबड आपल्या भाषणात म्हणाले की महाविद्यालयातील विद्यार्थ्यानी स्वतःच्या पायावर उभे राहाण्यासाठी कॉलेज जीवनातच चांगल्या प्रकारे तयारी करणे आवश्यक आहे. आपला बायोडाटा सक्षम व विकसित करून इतरही कौशल्याचे ज्ञान संपादन करावे. याप्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. देविदास गिरी, प्लेसमेंट सेलचे समन्वयक प्रा. गोपाळ लायरे उपस्थित होते.

पुणे येथील आयसीएमएस ट्रेनिंग संस्थेचे मानव संसाधन विभागाचे बलदेव माचवे, जीवन साळवे, दिव्या मुंदकर, किरण सावंत यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. प्रारंभी प्राचार्य डॉ. पी. आर. भाबड यांच्या हस्ते प्रमुख पाहुण्यांचा सत्कार व स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्लेसमेंट सेलचे समन्वयक प्रा. गोपाळ लायरे यांनी केले. प्रा. जी. टी. सानप व प्रा. डॉ. कल्पना वाजे यांनी सूत्रसंचालन केले. प्रा.  ए. बी। धोंगडे यांनी आभार मानले.  मुलाखतीसाठी पदवी व पदव्युत्तर विभागातील विद्यार्थी उपस्थित होते.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!