ज्ञानेश्वर महाले, इगतपुरीनामा न्यूज, दि. २४
त्र्यंबकेश्वर तालुका भारतीय जनता पार्टीची संघटनात्मक आढावा बैठक त्र्यंबकेश्वर येथे घेण्यत आली. यावेळी वाढोली येथील संदीप महाले यांची भाजपाच्या तालुका उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. निवड़ीचे पत्र उत्तर महाराष्ट्र संघटनमंत्री रवीजी अनासपुरे, जिल्हाध्यक्ष केदानाना आहेर यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी जिल्हा संघटन सरचिटणीस सुनील बच्छाव, त्र्यंबक नगर परिषद प्रभारी संपतराव नागरे, लोकसभा समन्वयक शरद कासार, तालुकाध्यक्ष विष्णू दोबाडे, नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोहगांवकर, ज्येष्ठ नेते गोविंदराव मुळे, विजय शिखरे, शहराध्यक्ष सुयोग वाडेकर उपस्थित होते.
वाढोली येथील संदीप महाले यांची भाजपाच्या तालुका उपाध्यक्षपदी निवड झाल्याने अंजनेरी गटात पक्षाला फायदा होणार आहे. जिल्हा संघटन सरचिटणीस सुनिल बच्छाव यांनी सर्वसामान्य जनतेपर्यंत मोदी सरकारच्या योजना पोहोचविण्याच्या कार्यास गती देण्याचे आवाहन यावेळेस कार्यकर्त्यांना केले. त्र्यंबकेश्वर शहरासाठी केंद्रातील मोदी सरकार २०० कोटींची प्रसाद योजना राबवित असुन त्याचा फायदा येथील स्थानिक नागरीक तसेच येणाऱ्या भाविकांना होणार आहे असे प्रतिपादन जिल्हाध्यक्ष केदानाना आहेर यांनी केले. केंद्र सरकारच्या योजनांचे श्रेय हे भारतीय जनता पक्षाचे व पंतप्रधान नरेंद्र मोदींचे असुन ते जनतेपर्यंत पोहचविण्याचे काम लोकप्रतिनिधी व कार्यकर्त्यांवर आहे असे त्यांनी नमूद केले. संघटनमंत्री रवी अनासपुरे यांनी संघटनात्मक आढावा घेतांना बूथ प्रमुख, शक्तिकेंद्र प्रमुख हाच भारतीय जनता पक्षाचा कणा असुन ‘मेरा बुथ सबसे मजबुत” योजना कार्यान्वित करण्याच्या सुचना केल्या. सर्वांना संघटनात्मक कार्यावर मार्गदर्शन केले.
याप्रसंगी सरचिटणीस सुयोग शिखरे, युवा मोर्चा अध्यक्ष विराज मुळे, बाळासाहेब अडसरे, ओबीसी अध्यक्ष प्रविण पाटील, आदिवासी आघाडी अध्यक्ष रामचंद्र गुंड, तालुका संघटन सरचिटणीस जयराम भुसारे, उपाध्यक्ष विजू पुराणिक, ओबीसी जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत बागडे, तेजस ढेरगे, रिपाई तालुकाध्यक्ष शांताराम बागुल, माजी नगरसेवक रविंद्र सोनवणे, नगरसेवक सागर उजे, कैलास चोथे, शाम गंगापुत्र, अशोक घागरे, नगरसेविका शिल्पा रामायणे, अनिता बागुल, चिटणीस संगिता मुळे, तिर्थविकास आघाडी अध्यक्ष बाळासाहेब कळमकर, शक्तिकेंद्र प्रमुख दत्तात्रय जोशी, चिटणीस अवधुत धामोडे, युवा मोर्चा सरचिटणीस संकेत टोके, गोपाळ झोंबाड, भुषण दाणी, सार्थक देवकुटे, मयुर चांदवडकर, बुथप्रमुख निषाद चांदवडकर, स्नेहल भालेराव, सुनिता भुतडा, ज्ञानेश्वर मोरे, काळू भांगरे, चंद्रकांत प्रभुणे, जनक गोऱ्हे, बाळासाहेब गोरे, संदीप महाले, संपत बदादे, कुणाल उगले आदी उपस्थित होते.