आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्याकडून आरोग्यदूत निवृत्ती पाटील गुंड यांचा सन्मान

इगतपुरीनामा न्यूज, दि. २४

नरेंद्र महाराज संस्थान नाणीज प्रणीत रूग्णवाहीकेच्या माध्यमातून गेल्या ११ वर्षांपासून हजारो रूग्णांचा प्राण वाचवला जातो. रात्री अपरात्री रूग्णालयात पोहोचवून हजारो रुग्णांना जीवनदान देणारे कावनईचे भूमिपुत्र आरोग्य दूत निवृत्ती पाटील गुंड यांचं कार्य तालुक्यासाठी सुपरिचित आहे. त्यांच्या प्रेरणादायी कार्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते मिलींद कुकडे यांनी आमदार डॉ. सुधीर तांबे यांना गोंदे येथे कार्यक्रमानिमित्त आले असता दिली. आमदार तांबे यांनी गुंड यांची आवर्जून भेट घेत त्यांच्या कार्याची प्रशंसा केली. यासह त्यांचा यथोचित सन्मान केला. यावेळी त्यांनी पुढील वाटचाल अशीच चालू राहो अशी सदिच्छा व्यक्त केली. अविरतपणे रूग्णसेवेच्या कार्याला कार्यरत रहाण्यासाठी सर्वोतोपरी सहकार्य राहील अशी ग्वाही डॉ. तांबे यांनी यावेळी दिली.
यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य संदीप गुळवे, मिलींद कुकडे, टिडीएफ शिक्षक संघटनेचे इगतपुरी तालुका प्रतिनिधी अमोल ढेरींगे व सहकारी उपस्थित होते.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!