
निलेश काळे, इगतपुरीनामा न्यूज, दि. २१
इगतपुरी तालुक्यात राजकीय घडामोडींना वेग आल्याचे दिसून येत आहे। मध्यंतरी थांबलेली राजकिय धावपळ पुन्हा वेग घेत आहे. नुकत्याच मंत्रीगट उपसमितीने ओबीसी आरक्षणा संदर्भात केलेली शिफारस व त्या अनुषंगाने झालेला अध्यादेश यामुळे बदलत्या स्थितीचा अंदाज घेऊन लगोलग काही इच्छुकांनी सोईच्या पक्षांतराला सुरुवात केल्यास आश्चर्य वाटायला नको. संभाव्य आरक्षणाचा क्रम पाहता व न्यायालयाने घालून दिलेल्या चक्री पद्धतीचा विचार करता सध्याचे आरक्षण वगळून आरक्षण निघणे क्रमप्राप्त आहे. तसे झाले तर खेड, नांदगाव सदो, वाडीवऱ्हे हे जिल्हा परिषद गट सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षित होण्याचे संकेत मिळत आहेत. शिरसाठे जिल्हा परिषद गटातील लोकसंख्या पाहता हा गट आदिवासी प्रवर्गासाठी आरक्षित होईल अशी दाट शक्यता आहे. या न्यायाचा विचार केल्यास घोटी गट आदिवासी प्रवर्गासाठी आरक्षित होण्याची शक्यता वाढली आहे. आता त्यादृष्टीने राजकारणात सुद्धा पक्षांतर वाढणार आहे.
त्यामुळे सध्याचे गट बदलतील हीच शक्यता गृहीत धरून अनेकांनी त्या दृष्टीने पाऊले टाकायला सुरुवात केली आहे. इगतपुरी तालुक्यातील पाच जिल्हा परिषद गटांचा विचार करता सध्याच्या आरक्षण वगळून नवीन आरक्षण पडल्यास आश्चर्य वाटायला नको तसा विचार करता खेड, नांदगाव सदो, शिरसाठे वाडीवऱ्हे हे गट सर्वसाधारण किंवा ओबीसी साठी पडण्याची शक्यता आहे. त्याच प्रमाणे घोटी हा गट आदिवासी राखीव झाल्यास नवल वाटायला नको. एकंदरीत बदलत्या स्थितीचा अंदाज घेऊन इच्छुकांची सोई नुसार धावपळ व पक्षांतराची लगबग येणाऱ्या दिवसांत दिसून येऊन राजकीय उलथापालथ इगतपुरी तालुक्यात दिसून येणार आहे. याचप्रमाणे पंचायत समितीच्या १० जागांसाठी सुद्धा आरक्षण बदलाचा धसका घेऊन पक्षांतर वाढणार असल्याची चर्चा आहे.
■ खेड जिल्हा परिषद गट
सध्याचे आरक्षण – अनुसूचित जमाती
■ नांदगाव सदो जिल्हा परिषद गट
सध्याचे आरक्षण – अनुसूचित जमाती
■ वाडीवऱ्हे जिल्हा परिषद गट
सध्याचे आरक्षण – अनुसूचित जमाती स्त्री
■ घोटी जिल्हा परिषद गट
सध्याचे आरक्षण – नागरिकांचा मागास प्रवर्ग
■ शिरसाठे जिल्हा परिषद गट
सध्याचे आरक्षण – अनुसूचित जमाती स्त्री
शिरसाठे हा गट जिल्हा परिषद गटांच्या अनुक्रमणिकेत वरच्या स्थानी असल्याने ह्या गटाची निवड आदिवासी प्रवर्गासाठी होईल अशी चर्चा राजकीय गोटात सुरू आहे. निवडणूक अभ्यासक असणाऱ्या तज्ञ व्यक्तीने सांगितले की, शिरसाठे गटाची आदिवासी लोकसंख्या ह्या गटाला आदिवासी आरक्षणाकडे घेऊन जाईल.