त्र्यंबकेश्वर आणि इगतपुरी तालुक्यातील अनेक दिग्गज नेत्यांचा इंदिरा काँग्रेस पक्षात प्रवेश : प्रदेशाध्यक्ष पटोले, आमदार खोसकर, ॲड. गुळवे यांच्या उपस्थितीत अनेकांनी केला प्रवेश

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षांतराला आले महत्त्व

इगतपुरीनामा न्यूज, दि. २१

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हरसूल जिल्हा परिषद गटाचे प्रबळ लोकनेते विनायक माळेकर यांनी भाजपातुन इंदिरा काँग्रेसमध्ये आज प्रवेश केला. त्यांच्यासोबत त्र्यंबकेश्वर पंचायत समितीचे सभापती मोतीराम दिवे, शिवसेनेचे युवा नेते मिथुन राऊत यांनीही काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. तिघांच्या काँग्रेस प्रवेशाने त्र्यंबकेश्वर तालुक्यातील राजकीय गणितांवर दूरगामी परिणाम होणार आहे. शेकडो कार्यकर्त्यांनी आपल्या नेत्यांवर विश्वास ठेवून काँग्रेस प्रवेश केला आहे. इंदिरा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पक्षात प्रवेश दिला. यावेळी इगतपुरी त्र्यंबकेश्वरचे आमदार हिरामण खोसकर, काँग्रेस नेते ॲड. संदीप गुळवे, संपतराव सकाळे आदींच्या उपस्थितीत सर्वांचे काँग्रेसमध्ये स्वागत करण्यात आले.

प्रदेश काँग्रेसचे नेते ॲड. संदीप गुळवे यांच्या नेतृत्वावर पुनश्च विश्वास ठेवून इगतपुरी तालुक्यातील शेतकरी नेते माजी तालुकाध्यक्ष पांडुरंग शिंदे, भाजप नेते संपत काळे, भाजयुमो तालुकाध्यक्ष निलेश कडू, रामदास बाबा मालुंजकर, रतन बांबळे, माजी सरपंच जयराम धांडे, राजाराम भोसले, कारभारी नाठे, माजी सरपंच रमेश जाधव, कचरू पाटील कडभाने, शिवाजी शिरसाठ, दत्तू वाजे, ज्ञानेश्वर भोसले, राजाराम शेलार यांनीही आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह काँग्रेसमध्ये पुनरागमन केले. या नेत्यांच्या प्रवेशामुळे इगतपुरी तालुक्यातील इंदिरा काँग्रेसला खऱ्या अर्थाने बळकटी आल्याचे ॲड. संदीप गुळवे म्हणाले. दरम्यान आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांमध्ये विक्रमी यश मिळणार असल्याचेही श्री. गुळवे यांनी अधोरेखित केले. जिल्हा परिषद पंचायत समितीच्या संभाव्य आरक्षणामुळे काही इच्छुक उमेदवारांनी आज काँग्रेसमध्ये प्रवेश करून दावेदारी केली असल्याचे सगळीकडे चर्चा आहे.

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हरसूल गटाच्या अपक्ष जिल्हा परीषद सदस्या इंजि. रुपांजली माळेकर यांचे पतीराज तथा इंजि. विनायक माळेकर हे हरसूल गटातील दिग्गज व्यक्तिमत्व आहे. त्र्यंबकेश्वरसह इगतपुरी तालुक्यातील राजकारणात त्यांचे मोठे वजन असून वरचष्मा आहे. सभापती मोतीराम दिवे हे सुद्धा प्रबळ व्यक्तिमत्व आहे. नाशिक जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष स्व. पांडुरंग राऊत यांचे चिरंजीव मिथुन राऊत यांचाही तालुक्यात चांगलाच दबदबा असून युवा पिढीवर त्यांची भक्कम पकड आहे. ह्या तिघांच्या काँग्रेस प्रवेशाने दोन्ही तालुक्यात राजकीय स्थित्यंतरे घडणार आहेत. शेकडो समर्थकांसह तिघांनी काँग्रेस पक्षाला बळकट केले आहे.

काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुक पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर तालुक्यात काँग्रेसला चांगले यश मिळण्याची शक्यता वाढली आहे. संबंधित पक्षात अनेक वर्षे काम करूनही अपेक्षित यश साधले जात नसल्याने ह्या पक्ष प्रवेशाला अनन्यसाधारण महत्व मानले जात आहे. निरगुडेचे सरपंच प्रविण तुंगार, चिरापाली सापतपालीचे सरपंच मोहन कनोजे, वायघोळचे सरपंच सुरेश झोले, सारस्तेचे सरपंच जानकीराम गायकवाड, चिंचवडचे सरपंच भगवान बेंडकोळी, सोमनाथनगरचे सरपंच मनोहर बेंडकोळी, माजी सरपंच अमृता कनोजे, ललीत तरवारे, रामचंद्र लिलके, गोपाळ राऊत, अशोक राऊत, दत्ता भोये, अशोक कनोजे, तोरंगणचे माजी सरपंच रामदास बोरसे, मुरलीधर बोरसे, वायघोळचे माजी सरपंच यशवंत धनगर, हरिदास राऊत,सरपंच धोंडीराम डगळे, रामा ढोरे, सरपंच मंगेश दिवे, मच्छिंद्र भडांगे, खंडु बेंडकोळी, सुरज जाधव, राजु दिवटे, दत्तु मुतडक, सरपंच तानाजी दिवे, माजी सरपंच त्र्यंबक दिवे, माजी उपसरपंच रमेश भोये, सरपंच नथु उदार, माजी सरपंच शरद महाले, सरपंच गोपाळा उघडे, बाळु उघडे, दिनकर कावरे, सरपंच मधुकर जाधव, भास्कर दिवे, सरपंच दत्तु उदार, विष्णु दिवे, माजी सरपंच गणपत जाधव, सरपंच शांताराम ठाकरे, सरपंच कैलास बेंडकोळी, देवचंद बेंडकोळी, प्रकाश जाधव, मनोहर बेंडकोळी, संजय बेंडकोळी, लहु बेंडकोळी, चंदर मोंढे, सरपंच युवराज बेंडकोळी, पांडु चहाळे, आनंदराव बेंडकोळी, निवृत्ती बेंडकोळी, सरपंच धनु बेंडकोळी, माजी सरपंच मोतीराम बेंडकोळी, सखाराम बेंडकोळी, काळु बाबा खोटरे, बुधा दोरे, उत्तम लिलके, पांडु कुंदे, विष्णु माळेकर, खंडु बेंडकोळी, मोहन पाटील यांनीही आपल्या नेत्यावर श्रद्धा ठेवीत पक्षप्रवेश केला.

■ माझ्या हरसूलसह त्र्यंबकेश्वर तालुक्यातील विकासाला गती देण्यासाठी इंदिरा काँग्रेसमध्ये प्रवेश केला. आदिवासी दुर्गम भागातील सर्व विकासकामे आगामी काळात होतील. समावेशक विचारधारेच्या पक्षात राहून ग्रामीण भागाचा कायापालट करण्याचे माझे स्वप्न लवकरच पूर्ण होईल.
- विनायक माळेकर, नूतन काँग्रेस नेते हरसूल
■ माझे वडील स्व. पांडुरंग राऊत यांनी हरसूल भागातील जनता जनार्दनासाठी खूप काम करायचे स्वप्न होते. इंदिरा काँग्रेसच्या माध्यमातुन त्यांचे स्वप्न पूर्ण करण्याचा माझा प्रयत्न यशस्वी होईल. जनतेसाठी यापुढेही माझी जनसेवा अविरत सुरू राहील.
- मिथुन राऊत, युवानेते

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!