निलेश काळे, इगतपुरीनामा न्यूज, दि. ११
राज्य सरकारने अलीकडेच अनेक निर्बध शिथिल केले आहेत. अनेक दिवसांपासून असलेले लॉकडाऊन व कडक निर्बंध आदींनी आलेली मरगळ झटकण्यासाठी तरुणीने सुवर्णमध्य साधून निसर्गाच्या सानिध्यात मन रमवून निसर्गाशी एकरूप होवू पाहत आहे.
रोहिणी नक्षत्रानंतर पडणारे मान्सूनपूर्व त्याचप्रमाणे चक्रीवादळामुळे जोरदार पाऊस बरसल्याने सगळीकडे हिरवळ तयार झाली आहे. शेतकऱ्यांनी देखील मशागतीची जोरदार तयारी केली आहे.
नाशिक जिल्ह्यामध्ये दहा-बारा दिवस कडक निर्बध शिथिल झाल्यानंतर मरगळ झटकण्यासाठी तरुणाई थेट जिकडे मन रमेल तिकडे फिरकली. इगतपुरी परिसरात लहान मोठे अनेक डोंगर व टेकड्या आहेत.
आजची तरुण पिढी सोशल मिडीयावर सक्रिय आहे, इन्स्टाग्राम फेसबुक, व्हॉट्स अँपवर नवनवीन फोटो टाकण्यासाठी स्पॉट शोधत असतात. निसर्गाच्या मोहित दृश्याने सध्या फोटोसेशनदेखील जोरात करण्यात सर्वच मग्न आहे.