रिपब्लिकन पार्टीच्या इगतपुरी तालुकाध्यक्ष वैशाली पालवे, भाजपाचे अल्पसंख्यांक नेते अस्लम शेख यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश : राष्ट्रवादी, शिवसेनेचे सर्व उमेदवार निवडून देण्याचे आवाहन 

इगतपुरीनामा न्यूज – रिपब्लिकन पार्टीच्या इगतपुरी तालुकाध्यक्ष वैशाली पालवे, भारतीय जनता पार्टीचे अल्पसंख्यांक नेते अस्लम शेख यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस घड्याळ पक्षात प्रवेश केला. इगतपुरीचे आमदार हिरामण खोसकर यांच्या नेतृत्वाखाली हा प्रवेश झाला. इगतपुरी नगरपरिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस घड्याळ, शिवसेना धनुष्यबाण, रिपब्लिकन सेना महायुतीच्या सर्व उमेदवारांना विजयी करण्याचे त्यांनी यावेळी आवाहन केले. नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ. शालिनीताई संजय खातळे यांच्यासह सर्व उमेदवार भरभरून मतांनी विजयी होतील. इगतपुरी शहराला विकसित करण्यासाठी सर्वांना विजयी करावे असेही त्यांनी सांगितले. 

error: Content is protected !!