
भास्कर सोनवणे : इगतपुरीनामा न्यूज : इगतपुरी तालुक्यातील राजकारणाच्या पटलावर आज एक नवे, तेजस्वी आणि आशादायी नाव झळकत आहे ते म्हणजे भूषण प्रभाकर जाधव. समाजकारणातून आलेला अनुभव, लोकांच्या सुखदुःखाचे भान आणि सकारात्मक बदल घडवण्याची तळमळ या तीन गोष्टींवर आपली भक्कम पायाभरणी करत तो राजकारणात नव्या सूर्याप्रमाणे उदयास येत आहे. भूषण जाधव यांचा संघर्ष नवीन नाही. काळाच्या ओघात त्याच्यावर अनेक संकटांची छाया आली. अनेकांनी त्याला अभिमन्यूप्रमाणे चक्रव्यूहात अडकवण्याचा प्रयत्न केला. परंतु जिद्द, धैर्य आणि लोकांवरील अपार विश्वास यांच्या जोरावर त्याने प्रत्येक चक्रव्यूहाला तडा देत आपला मार्ग स्वतःच प्रशस्त केला. कारण भूषणचे ध्येय स्पष्ट आहे समाजकारणाच्या बळावर राजकारण…! ८० टक्के समाजकारण, २० टक्के राजकारण” या बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना सलाम करणारा भूषण जाधव इगतपुरी नपा निवडणुकीत जिंकणारा तरुण चेहरा आहे. प्रखर विचारवंत हिंदुहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्यावर जीवापाड श्रद्धा असल्याने गावातील शेतकरी, छोटे मोठे उद्योगधंदे, बेरोजगार तरुण, गोरगरीब कुटुंबे, विधवा माताजी, ज्येष्ठ नागरिक या प्रत्येक घटकांसाठी भूषण जाधव आजवर निस्वार्थीपणे धावून जातच आहे. त्याच्या समाजकार्यात दर्प नाही, दिखावा नाही; आहे ती फक्त मनापासून केलेली सेवा. ही अमूल्य सेवा करणारा भूषण जाधव आज इगतपुरीच्या गावठा प्रभागातून निवडणूक रिंगणात उतरला आहे. त्याच्या पाठीशी आपण सर्वांनी राहून त्याला अभूतपूर्व मतांनी इगतपुरी नगरपालिकेत पाठवायचे आहे. यासाठी कितीही प्रलोभने आली तरी भूषण जाधव आपल्याला इगतपुरी नगरपालिकेत पाहिजे आहे. आपण यासाठी संकल्प करावा अशी ज्वलंत भावना इगतपुरी शहरात उमटत आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेना पक्षाच्या मशाल चिन्हावर भूषण जाधव हा महाविकास आघाडीचा जिंकणारा युवा चेहरा म्हणून पहिल्या क्रमांकावर आलेला आहे.