इगतपुरीनामा न्यूज, दि. ५ – इगतपुरी येथील महाविद्यालयात अकरावी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनीचा तिच्या गावाजवळ रेल्वे अपघातात मृत्यू झाला आहे. ही घटना आज घडल्याचे समजताच जानोरी गावावर शोककळा पसरली आहे. कानाला मोबाईलचा हेडफोन लावून ती रेल्वे रुळ ओलांडत होती. यावेळी गाडीचा आवाज तिला ऐकू न आल्याने तिला जीव गमवावा लागला. प्रियंका नामदेव कोकणे वय १७ रा. जानोरी, ता. इगतपुरी, जि. नाशिक असे दुर्दैवी विद्यार्थिनीचे नाव आहे. ती इगतपुरी येथे अकरावीमध्ये शिकत होती. जानोरी येथील रेल्वे फाटकाजवळ मोबाईलवर बोलत महाविद्यालयात निघाली होती. कानातल्या मोबाईलवर बोलत असल्यामुळे मागुन येत असलेल्या रेल्वेचा तिला आवाज न आल्याने चालत असतांना अचानक आलेल्या रेल्वेने उडवल्याने या अपघातात या मुलीचा दुर्देवी अंत झाला.
Similar Posts
error: Content is protected !!
WhatsApp us
Join WhatsApp Group