
इगतपुरीनामा न्यूज – व्हिटीसी फाटा ते साकुर फाटा रस्ता रुंदीकरणादरम्यान अस्वली स्टेशनच्या बेघर होणाऱ्या नागरिकांना दिलासा देण्याबाबत निर्णय घ्यावा या मागणीचे निवेदन सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता शशांक गजभिये, शाखा अभियंता तुषार मोरे यांना देण्यात आले. एमएसआरडीसी यांनी समृद्धीला जोडणाऱ्या व्हिटीसी फाटा ते भरवीर फाटा या उपरस्त्यासाठी अस्वलीच्या बाजूने शेतकऱ्यांकडून जमीन पूर्वीच अधिग्रहित केलेली आहे. तथापि सध्या साकुर फाटा रस्त्याच्या रुंदीकरणाच्या कामादरम्यान अस्वली स्टेशनच्या नागरिकांची घरे तोडून त्यांना बेघर करण्याची कारवाई सुरू आहे, हे अत्यंत दुर्दैवी आहे. आधीच अधिग्रहित केलेली जमीन उपलब्ध असताना गावातील रहिवाशांना विस्थापित करण्याचा निर्णय योग्य नाही. रस्ता रुंदीकरणाचे काम तत्काळ थांबवावे. पूर्वी अधिग्रहित बाजूनेच रस्त्याचे विस्तारीकरण करण्यात यावे, अस्वली ग्रामस्थांना बेघर होण्यापासून वाचवण्यासाठी आवश्यक ते दिलासादायक निर्णय घेण्यात यावेत. अन्यथा जनआंदोलन करण्यात येईल अशी मागणी मनसे इगतपुरी विधानसभा अध्यक्ष गणेश मुसळे, सामाजिक कार्यकर्ते साहेबराव धोंगडे, उत्तम दराडे, महेश गायकवाड, सुनील मुसळे, योगेश मेदडे, रमेश रोकडे, बाबा शेट्टी, दीपक जोशी, बाळू सवणे, दत्तू काजळे, महेश देवरे, सागर भांगरे, बाळू आंबेकर, दत्तू राजभोज, सदानंद आंबेकर, रामदास भंडारी, अनिल मुसळे, कचरू मुसळे, प्रवीण साबळे, ज्ञानेश्वर मुसळे, सीताराम चौधरी, कृष्णा बर्डे, मुख्तार मणियार, रोहिदास शंकपाळ, राजेंद्र शंकपाळ , अमोल दराडे, बबन दराडे, शिवाजी दराडे, तुकाराम मुसळे, मेहरबानो मणियार, रुस्तम शेख, भीमा गरुड, निलेश आंबेकर, संतोष डांगरे, अविनाश राजभोज, मंगल भुराबडे, चंद्रकला नाडेकर, पार्वता आव्हाड, सुमित मोरे, सरस्वती लांडगे, रूपाबाई माळी, निवृत्ती माळी आदी उपस्थित होते.