आदिवासी सेल प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल आमदार हिरामण खोसकर यांचा गोंदे दुमाला येथे सत्कार

इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरीचे आमदार हिरामण खोसकर यांची महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आदिवासी सेल विभागाच्या प्रदेशाध्यक्षपदी नुकतीच वर्णी लागली. याबद्दल खासदार राजाभाऊ वाजे, मविप्रचे संचालक ॲड. संदीप गुळवे, घोटी कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक रमेश जाधव यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. गोंदे दुमाला येथे महामार्गाच्या रखडलेल्या उड्डाण पुल कामाच्या बैठकीप्रसंगी आमदार हिरामण खोसकर यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. ह्या पदाच्या माध्यमातून तळागाळातील समस्या सोडवणार असल्याचे आ. खोसकर यांनी सांगितले. याप्रसंगी सरपंच शरद सोनवणे, माजी सरपंच गणपत जाधव, माजी उपसरपंच कमलाकर नाठे, परशराम नाठे, रुंजा धोंगडे, दशरथ आहेर, हभप अशोक महाराज धांडे, जयराम धांडे, सामाजिक कार्यकर्ते मोहन जाधव, दिनेश धोंगडे, प्रकाश पाटील, गोपी धांडे, दिनेश धांडे आदी परिसरातील नागरिक उपस्थित होते.

error: Content is protected !!