जि. प. नाशिक पुरस्कृत महिला स्नेही व बालिका स्नेही मॉडेल ग्रामपंचायत पिंपळगाव डुकरा येथे महिला सभा व महिला प्रशिक्षण संपन्न : जागतिक महिला दिनानिमित्त यशदा पुणे व ग्रामपंचायतीचा संयुक्त उपक्रम

इगतपुरीनामा न्यूज – यशदा पुणे, जिल्हा परिषद नाशिक आणि आदर्श ग्रामपंचायत पिंपळगाव डुकरा यांच्या संयुक्त विद्यमाने पिंपळगाव डुकरा येथे जागतिक महिला दिना निमित्त महिला सभा, प्रशिक्षण कार्यक्रम व महिलांची आरोग्य तपासणी उत्साहात संपन्न झाली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी इगतपुरीचे गटविकास अधिकारी महेश वळवी होते. यावेळी नोडल अधिकारी वंदना सोनवणे, विस्ताराधिकारी संजय पवार, प्रशासक साहेबराव देशमुख, सीएचओ मोरे, यशदाच्या प्रशिक्षक लीना साळुंके, ग्रामपंचायत अधिकारी हर्षिता पिळोदेकर, महिला बचत गटप्रमुख मालन भगवान वाकचौरे उपस्थित होते. यानंतर यशदाच्या प्रशिक्षक लीना साळुंखे यांनी महिला व बालिका स्नेही ग्रामपंचायत तयार करण्याबाबत महिलांना उत्तम मार्गदर्शन करून प्रशिक्षण दिले. प्रशिक्षणाला प्रार्थनेने सुरुवात झाली. महिला स्नेही व बालिका स्नेही ग्रामपंचायत तयार करणे, लिंग आधारित हिंसाचाराचे निराकरण व पंचायतीची भूमिका, बालविवाह प्रतिबंध करण्यास पंचायतीची भूमिका, महिला सभेचे आयोजन यावर त्यांनी सर्वांगीण माहिती दिली. यावेळी महिला सभेला उपस्थित सर्व महिलांची आरोग्य तपासणी तज्ञ डॉक्टरांकडून करण्यात आली. विशेष उल्लेखनीय कर्तृत्व करणारी गावातील पहिली महिला पोलीस संगीता खंडू सहाणे, माध्यमिक शिक्षिका मंगल विनोद वाकचौरे या कर्तृत्ववान महिलांना लहान झाड व प्रमाणपत्र देऊन गटविकास अधिकारी महेश वळवी यांनी सन्मानित केले. ५० महिलांना प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र देण्यात आले. यावेळी महिला सक्षमीकरण अंतर्गत बँकेतर्फे लाभार्थी महिलांना गोल्डन कार्डबाबत शिबीरात १८ ते ६५ वयोगटातील महिलांचे बँक खाते तपासून लाभाबाबत नियोजन केले. ग्रामपंचायत घराच्या रेकॉर्डला महिलांच्या नोंदी त्यांच्या पतीच्या नावासोबत करण्यात आल्या. बालविवाहाबाबत जनजागृती करून आळा घालण्यात येत असून माझी वसुंधरा अभियान अंतर्गत एकल प्लास्टिक बंदीची सर्वांनी शपथ घेतली. गीताबाई वाकचौरे, योगिता वाकचौरे, विजया जाधव, कचराबाई वाकचौरे, विमल सूर्यवंशी या महिलांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन प्राथमिक शिक्षिका रंजना महाजन व ग्रामपंचायत अधिकारी हर्षिता पिळोदेकर यांनी केले. सर्व अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, ग्रामपंचायत कर्मचारी, ऑपरेटर यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचा गावातील १०० पेक्षा जास्त महिलांनी फायदा घेतल्याबद्दल त्यांना डब्यांचे वाटप झाले. 

Similar Posts

error: Content is protected !!