भास्कर सोनवणे : इगतपुरीनामा न्यूज – प्रचंड चुरस, अस्तित्वाची लढाई आणि आरोपांच्या फैरी यामुळे गाजत असलेल्या इगतपुरी विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची आज सांगता झाली. आता गुप्त बैठका, राजकीय डावपेच, भेटीगाठी रंगणार आहे. महाविकास आघाडी इंदिरा काँग्रेसचे लकीभाऊ जाधव, महायुतीचे हिरामण खोसकर, मनसेचे काशिनाथ मेंगाळ, अपक्ष निर्मला गावित, अपक्ष बाळासाहेब झोले, जनवादी पक्षाचे अनिल गभाले, वंचितचे भाऊराव डगळे, स्वराज्यचे शरद तळपाडे आदी सर्व उमेदवारांनी संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढला. हटके प्रचार करण्यात काँग्रेसचे उमेदवार लकीभाऊ जाधव हे अव्वल ठरले. पारंपारिक पद्धतीने म्हणजे पत्रक वाटणे, मतदारांच्या भेटी गाठी घेणे, वेगवेगळ्या समाजाच्या आणि सदेव राजकीय पक्षांच्या नेत्यांना भेटणे, असा प्रचार करतानाच हायटेक यंत्रणेचा देखील त्यांनी उपयोग करून घेतला. सोशल मीडियाच्या माध्यमातून नागरिकांसमोर जाण्याचा प्रयत्न असणे, वेगवेगळ्या स्वरूपाची गाणी तयार करून आपली पंजा निशाणी शेवटच्या टोकातील गावच्या नागरिकांपर्यंत पोहोचवण्यात ते कमालीचे यशस्वी ठरले. कास गावापासून ते इगतपुरी तालुक्याच्या हद्धीपर्यंत प्रत्येक गावात त्यांची प्रचाररॅली पोहोचल्यावर सर्वच युवावर्ग सक्रियतेने सहभागी होत होता. गरिबांचे लेकरू म्हणत अनेक गरीब प्रवर्गातील लोकांनी त्यांना अक्षरशः डोक्यावर घेतले. विरोधकांनी मोलाने आणलेले कार्यकर्ते, गाड्यांचा ताफा आणि पैशांचा पाऊस लोकांच्या आणि युवकांच्या चांगला ध्यानात आला. त्यामुळे आर्थिक परिस्थिती नाजूक असणाऱ्या लकीभाऊ जाधवच्या खिशात लोकांनी स्वतःहून पदरमोड करून साठवलेली छोटीशी आर्थिक मदत सुद्धा केली. असं भाग्य क्वचितच एखाद्याच उमेदवाराला मिळते. तरुणांनी लकीभाऊ जाधव ह्या त्यांच्या आयडॉलसाठी घरोघरी स्वतः पुढाकार घेऊन ह्या निवडणुकीला अर्थ आणला. एकंदर काँग्रेसचे लकीभाऊ जाधव हे जनमाणसाच्या मनात खरोखर भक्कम स्थान निर्माण करून गेले. परिणामस्वरूप २० तारखेला लोकांचे भरभरून मतदान लकीभाऊ जाधवला मिळाल्याशिवाय राहणार नाही.
Similar Posts
error: Content is protected !!
WhatsApp us
Join WhatsApp Group