❝मीच लकीभाऊ अन मीच आमदार❞ – संघर्षयोद्धा लकीभाऊ जाधव यांना विधानसभेत पाठवण्यासाठी युवावर्ग झपाटला : काँग्रेसचे राष्ट्रीय नेते खा. राहुल गांधी यांनी स्वतः घातले इगतपुरीत लक्ष

इगतपुरीनामा न्यूज – काँग्रेसचे राष्ट्रीय नेते खा. राहुल गांधी यांनी शेवटच्या क्षणी व्यक्तिशः लक्ष घालून इगतपुरी त्र्यंबकेश्वर विधानसभेचे तिकीट लकीभाऊ जाधव यांना दिले. राहुल गांधी या मतदारसंघात प्रचाराची सभा सुद्धा घेण्याची शक्यता आहे. इंदिरा काँग्रेस, शिवसेना उबाठा, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार आणि मित्रपक्षांच्या महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार म्हणून महाराष्ट्र राज्यात आदिवासी समाजाचे आक्रमक लढाऊ नेतृत्व लकीभाऊ जाधव यांना इगतपुरी विधानसभा मतदारसंघात संधी मिळाली आहे. लकीभाऊ जाधव म्हणजे मीच असे समजणारे आणि त्यांच्यासाठी काहीही करायला तयार असणारी युवकांची मोठी फळी मतदारसंघासह संपूर्ण राज्यभर आहे. सर्वच आदिवासी समाजासाठी लढा देणारा सामान्य गरीब कुटुंबातील तरुण लकीभाऊ जाधव अत्यंत दिलदार स्वभावाचे आहे. लकीभाऊ जाधव यांना आमदार म्हणून विधानसभेत पाठवण्यासाठी आजपासून सगळ्या युवकांनी नव्या दमाने ही निवडणूक हातात घेतली आहे. 

लकीभाऊ जाधव यांची सामाजिक, कौटुंबिक पार्श्वभूमी, राजकीय, सामाजिक प्रवास अत्यंत खडतर आहे. असे असतांना हा सामान्य कार्यकर्ता राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांना आकर्षित करून इगतपुरीची उमेदवारी मिळवतो ही बाब अजिबात सोपी नाही. आदिवासी समाजाचे नवे नेतृत्व म्हणून लकीभाऊ जाधव विधानसभा, राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर आणण्यासाठी स्वतः राहुल गांधी आग्रही असल्याचे समजते. लकीभाऊ जाधव यांनी विद्यार्थी दशेपासून आदिवासी विद्यार्थ्यांचे हजारो प्रश्न वेळोवेळी सोडवलेले आहेत. शासनाची विद्यार्थ्यांसाठी आणलेली जाचक डीबीटी योजना, पेसा भरतीचे मोठे आंदोलन, आदिवासी आरक्षणात बोगस आरक्षण घुसखोरी यासारख्या प्रश्नांसाठी गल्ली ते दिल्लीपर्यंत त्यांनी लढा दिलेला आहे. हा लढा अधिक तीव्र आणि पुढे नेण्याचं काम लकीभाऊ जाधव करत आहेत. आदिवासी जनतेसह सर्वांसाठी काम करणारा हा संघर्ष योद्धा इगतपुरी विधानसभेत निवडून आणून आमदार करण्यासाठी युवावर्ग झपाटून काम करणार आहे. त्यांच्या माध्यमातून इगतपुरी त्र्यंबकेश्वर मतदारसंघातील प्रलंबित असलेले शिक्षण, आरोग्य, रोजगार, पायाभूत विकास, औद्योगिक, पर्यटन आदी प्रश्न सोडवायला प्राधान्य मिळणार आहे.

Similar Posts

error: Content is protected !!