जनसेवेसाठी २४ तास सक्रिय असणारे सर्वसमावेशक माजी आमदार काशिनाथ मेंगाळ : सर्वात तरुण आमदार म्हणून गिनीज बुकात नोंद : शिवसेना शिंदे गट तथा महायुतीतर्फे २०२४ ला होणार आमदार

भास्कर सोनवणे – इगतपुरीनामा न्यूज – २००४ पूर्वीच्या काळात इगतपुरी तालुक्याच्या दुर्गम आदिवासी भागातील विकासाचे भयाण वास्तव, पाण्यासाठी गावोगावी होणारा मायबहिणींचा आटापिटा, शिक्षणाच्या सोयीसुविधांचा अभाव, रस्ते आणि दळणवळणाच्या दरिद्री व्यवस्था, युवकांना स्वयंरोजगार आणि हक्काच्या रोजगारासाठी करावी लागणारी कसरत आणि भूमिपुत्र शेतकऱ्यांचा पिकांना पाणी द्या म्हणणारा आर्त टाहो हृदय पिळवटून टाकणारा होता. हे जळजळीत भयानक वास्तव पाहून एक युवक पेटून उठत होता. दुर्गम भागातच जन्म आणि शिक्षण झाल्याने इथल्या लोकांच्या व्यथा आणि कथा पाहून त्याचे नेहमीच डोळे भरून येत होते. यासाठी हा युवक वेगवेगळ्या प्रकारे आपल्या स्तरावरून आटोकाट प्रयत्न करीत होता. यामध्ये त्याला बहुतांशी यशही मिळत होते. एसटी बसने इगतपुरी पंचायत समिती ते तहसीलदार कार्यालय आणि जिल्हाधिकारी ते मंत्रालयात जाऊन लोकांच्या प्रश्नांची त्याने सोडवणूक केली. हा युवक दुसरा तिसरा कोणी नसून इगतपुरीचे माजी आमदार काशिनाथ दगडू मेंगाळ हा आहे. शिवसेनाप्रमुख हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी लोकांसाठी तो करीत असलेल्या प्रचंड धडपडीची दखल घेऊन त्याला मातोश्रीवर बोलावून घेतले. लोकांमध्ये प्रचंड लोकप्रियता असल्याने शिवसेनेतर्फे २००४ च्या इगतपुरी विधानसभा निवडणुकीत काशिनाथ मेंगाळ यांना उमेदवारी देण्यात आली. गावागातील लोकांनी काशिनाथ मेंगाळ यांचा प्रचार मोठ्या ताकदीने केला. अपेक्षेनुसार २००४ च्या इगतपुरी विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील सर्वात तरुण आमदार म्हणून शिवसेनेतर्फे काशिनाथ मेंगाळ निवडून आले. या विक्रमाची नोंद गिनीज बुकात सुद्धा झालेली आहे. 

संपूर्ण मतदारसंघात प्रत्येक व्यक्तीशी कुटुंबातला सदस्य म्हणून काशिनाथ मेंगाळ यांनी आपली कारकिर्द पार पाडली. प्रचंड महत्वाकांक्षा आणि लोकांसाठी काम करण्याचे व्रत यामुळे २००४ ते २००९ हे पाच वर्ष इगतपुरी मतदारसंघाचा सुवर्णकाळ ठरले. हाच सुवर्णकाळ २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत आमदारपदी निवडून येऊन अमृतकाळ बनवण्यासाठी काशिनाथ मेंगाळ सरसावले आहेत. ह्यावर्षी इगतपुरी मतदारसंघाचे आमदार म्हणून प्रतिनिधित्व करण्यासाठी जनतेमधून काशिनाथ मेंगाळ यांनाच विधानसभेत पाठवण्याचे धोरण विविध भागात ठरवण्यात आलेले आहे. आमचे यावर्षीचे आमदार म्हणून कोणत्याही परिस्थितीत काशिनाथ मेंगाळ हेच निवडून येणार आहेत असा विजयी संकल्प करण्यात आलेला आहे. आतापर्यंत अनेकांना संधी दिली मात्र त्यांनी लोकांच्या अपेक्षा धुळीस मिळवून मतदारसंघाला मागे नेण्याचेच काम केले. आता काशिनाथ मेंगाळ यांच्याशिवाय मतदारसंघाला तरणोपाय नाही अशी भावना व्यक्त होत आहे. शिवसेना शिंदे गटाची अर्थात महायुतीची उमेदवारी मिळवून काशिनाथ मेंगाळ जनतेची आणि आपली ताकद सर्वांना दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही असे मत मतदारसंघात मांडले जातेय. पदावर असो किंवा नसो गोरगरीब लोकांसाठी कायम हक्काचे व्यासपीठ म्हणून काशिनाथ मेंगाळ यांनी सक्रियतेने काम केले आहे. लहान मोठा, गरीब श्रीमंत असा कोणताही भेदभाव न करता विकासाची कामे करण्यात त्यांचा हातखंडा आहे. कोणत्याही राजकीय, सामाजिक व्यक्तीशी किंवा कोणाशीही शत्रूत्व नाही. कोणाच्या कामात ढवळाढवळ नाही अन सर्वांशी घनिष्ठ मैत्री जपणारे काशिनाथ मेंगाळ एकमेवाद्वितीय आहेत.

इगतपुरी विधानसभा मतदारसंघातील बिगर आदिवासी समाज, ठाकूर समाज, महादेव कोळी आणि अन्य आदिवासी समाज ही काशिनाथ मेंगाळ यांची मोठी ताकद आहे. ह्याचा त्यांनी कायमचा सर्वांना अनुभव दाखवून दिला आहे. पाच वर्ष आमदारकीनंतर २००९ च्या निवडणुकीत मनसेतर्फे लढवलेल्या निवडणुकीत अल्प मतांनी त्यांची दुसरी टर्म हुकली. २०१४ मध्ये अपक्ष उमेदवारी करून भरघोस मते त्यांनी मिळवली पण विरोधकांनी मतविभाजनाचा प्रयोग यशस्वी केल्याने ते पराभूत झाले. २०१९ ला स्वतंत्रपणे निर्णय घेऊन त्यांनी निवडणुकीत किंगमेकरची भूमिका पार पाडली. या निवडणुकीत त्यांच्यासाठी अनेक दिग्गज किंगमेकर बनणार असल्यामुळे त्यांचा विजय निश्चित मानला जातो आहे. मतदारसंघाच्या बाहेर जाऊन दोन वेळा जिल्हा परिषद सदस्यपद, जिल्हा परिषदेत समाजकल्याण सभापतीपद खेचून आणत काशिनाथ मेंगाळ यांनी सामान्य लोकांची सर्वच कामे करण्यासाठी जीवाचे रान केले. शिवसेना शिंदे गट अर्थात महायुतीची उमेदवारी करून जनसेवेचा हा वारसा अखंडित करण्यासाठी काशिनाथ मेंगाळ सज्ज झालेले आहेत. २०२४ ची इगतपुरी त्र्यंबकेश्वर विधानसभा निवडणूक जिंकत आमदार म्हणून त्यांना विधानसभेत पाठवण्यासाठी जनतेची पहिली पसंती असेल. यासाठी मतदारसंघातील वाड्या पाडे, वस्त्या आणि गावांमध्ये नियोजन झाले आहे. सर्व लोकांच्या आशिर्वादाने ह्या निवडणुकीत काशिनाथ मेंगाळ हेच प्रचंड मताधिक्याने विजयी होतील असा विश्वास सर्वांना आहे. 

Similar Posts

error: Content is protected !!