शिवसेनेचे प्रबळ इच्छुक उमेदवार रवींद्र भोये यांना इगतपुरी परिसरात अभूतपूर्व प्रतिसाद : इगतपुरी त्र्यंबकेश्वरचा कायापालट करण्यासाठी वचनबद्ध असल्याचा दिला शब्द

इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी त्र्यंबकेश्वर मतदार संघात मोठ्या प्रमाणात बेरोजगारी आहे. ही बेरोजगारी कमी व्हावी म्हणून दोन्हीही तालुक्यात अजून औद्योगिक वसाहतीसाठी पुढाकार घेऊन प्रयत्न करणार आहे. इगतपुरी त्र्यंबकला मोठ्या कंपन्या आणल्यानंतर येथील स्थानिक बेरोजगार युवकांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होईल. मोठ्या प्रमाणात धरणे असून देखील मार्च महिन्यानंतर महिलांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागते. यावर ठोस उपाययोजना केल्या पाहिजेत. अनेक आदिवासी कुटुंबे घरकुलापासुन वंचित आहेत. त्या प्रत्येक कुटुंबाला घरकुल मिळावे यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार असून इगतपुरी तालुक्याला पर्यटन स्थळाचा दर्जा मिळवण्यासाठी पाठपुरावा करून येथील स्थानिक युवकांना रोजगार मिळवण्यासाठी प्रयत्न करणार आहे. हा मतदार संघ विकासापासून कोसो दूर आहे. विकासासाठी एकाही आमदाराने आत्तापर्यंत पुढाकार न घेतल्याने नागरिकांचा विकास खुंटला आहे. या मतदारसंघासाठी भरीव निधी आणुन विकास करण्यासाठी प्रयत्न करणार असे प्रतिपादन शिवसेना शिंदे गटाचे प्रबळ इच्छुक उमेदवार रविंद्र भोये यांनी केले. इगतपुरी शहर आणि परिसरात घाटनदेवी दर्शन करून सुरु झालेल्या रॅलीला इगतपुरीकरांचा अभूतपूर्व प्रतिसाद लाभला. इगतपुरीतील आण्णाभाऊ साठे वाचनालयात शिवसेना शिंदे गटाच्या वतीने सभा आयोजित करण्यात आली होती. ह्या सभेत इच्छुक उमेदवार रविंद्र भोये यांनी निवडणूक लढवण्याचा निर्धार व्यक्त करून ह्या मतदारसंघाचा कायापालट करण्याचा उपस्थितांना शब्द दिला. शिवसेनेत कोणतेही मतभेद नसुन पक्षाचा उमेदवार निवडुन आणुन मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांचे हात बळकट करण्यासाठी आमचा प्रयत्न राहील असे उपजिल्हाप्रमुख रघुनाथ तोकडे यांनी सांगितले.शिवसेना जो उमेदवार देईल त्या उमेदवाराला निवडुन आणण्याची जबाबदारी संपूर्णपणे आम्ही घेऊ अशी ग्वाही ज्येष्ठ नेते संपतराव काळे यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केली. याप्रसंगी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख रघुनाथ तोकडे, ज्येष्ठ नेते संपतराव काळे, त्र्यंबकेश्वर शहर प्रमुख सुरेश गंगापुत्र, युवासेनेचे जिल्हा उपाध्यक्ष मिथुन राऊत, युवासेना तालुकाप्रमुख पप्पु मेढे, शिवसेना महिला आघाडीच्या पुजा धुमाळ, उपतालुकाप्रमुख अरुण भागडे, मयुर दोंदे, बबन हाडप यांच्यासह शेकडो कार्यकर्ते व महिला सहभागी झाले होते. हरसुल येथील शिवसेनेचे इच्छुक उमेदवार रविंद्र भोये यांनी इगतपुरीचे आराध्य दैवत घाटनदेवी मातेचे दर्शन घेतले. यावेळी रविंद्र भोये यांच्यामागे समर्थकांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी रविंद्र भोये यांनी इगतपुरी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. या सभेला त्र्यंबकेश्वर आखाड्यातील अनेक साधु देखील उपस्थित होते.

Similar Posts

error: Content is protected !!