
इगतपुरीनामा न्यूज – नाशिक जिल्ह्यातील महत्वाच्या घोटी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपसभापतीपदी संपत किसन वाजे यांची बिनविरोध निवड झाली आहे. या निवडीचे सर्व स्तरात स्वागत होऊन त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. घोटी कृषी उत्पन्न बाजार समिती सभागृहात उपसभापती निवडीसाठी संचालकांची सभा आज पार पडली. सहाय्यक निबंधक सहकारी संस्था तथा निवडणूक अधिकारी म्हणून अर्चना सैंदाणे यांनी कामकाज केले. सचिव जितेंद्र सांगळे यांनी त्यांना सहाय्य केले. यावेळी बाजार समितीचे मार्गदर्शक ॲड. संदीप गुळवे यांनी घोटी कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत शेतकरी मतदारांनी आपल्यावर मोठा विश्वास ठेवून निवडून दिले. त्या विश्वासाला कदापिही तडा जाणार नाही याची दक्षता घेऊन बाजार समितीच्या कारभारात शेतकरी हिताला सर्वोच्च प्राधान्य दिले जावे. स्वच्छ व कुशल कारभार करावा असे प्रतिपादन अभिनंदन करतांना केले. यावेळी शिवसेना नेते निवृत्ती जाधव, माजी सभापती तथा विद्यमान संचालक ज्ञानेश्वर लहाने, बाळा गव्हाणे, जयराम धांडे, गुलाब वाजे हजर होते. निवडीच्या बैठकीत बाजार समितीच्या सभापती सुनीता गुळवे, संचालक रमेश जाधव, शिवाजी शिरसाठ, राजाराम धोंगडे, सुनील जाधव, भाऊसाहेब कडभाने, अर्जुन भोर, दिलीप चौधरी, ॲड. मारुती आघाण, नंदलाल पिचा, आशा खातळे, भरत आरोटे आदी उपस्थित होते. संपत किसन वाजे यांच्या उपसभापतीपदासाठी संचालक अर्जुन पोरजे यांनी सूचक म्हणून तर रमेश जाधव यांनी अनुमोदन दिले. एकमेव अर्ज आल्याने निवडणूक अधिकाऱ्यांनी त्यांच्या बिनविरोध निवडीची घोषणा केली. समाधान गुंजाळ, शरद कुटके, दिलीप जाधव, हरिश्चंद्र बऱ्हे, रेवणनाथ गुंजाळ, रमेश देवगिरे, प्रताप जाधव, तानाजी बऱ्हे, गोरख वाजे, राजेंद्र जाधव, तन्मय जाधव आदी कार्यकर्त्यांनी जल्लोष करून आनंदोत्सव केला.