इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुक्यातील वाडीवऱ्हे सांजेगाव रस्त्यावर आज दुपारी अज्ञात वाहनाने मोटारसायकलला धडक दिल्याने अपघात झाला. आज दुपारी १ वाजेच्या सुमाराला झालेल्या ह्या घटनेत १ जण ठार तर २ जण गंभीर जखमी झाले आहेत. जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थान नानिज धाम मोफत रुग्णवाहिकेचे रुग्णमित्र निवृत्ती पाटील गुंड यांनी समयसुचकतेने अपघातस्थळी दाखल होऊन जखमींना नाशिकच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. जखमीपैकी दत्ता तुकाराम वारुंगसे वय ५० रा. गोंदे दुमाला यांना डॉक्टरांनी तपासणीअंती मयत घोषित केले. नाना कोंडाजी खडके वय ५२, रविना कोंडाजी खडके वय २२ रा. गोंदे दुमाला, ता. इगतपुरी, जि. नाशिक ह्या गंभीर जखमी व्यक्तींवर उपचार सुरु करण्यात आले आहेत. भरधाव वाहनांच्या वेगावर नियंत्रण येण्यासाठी या रस्त्यावर उपाययोजना करणे आवश्यक आहे. कायम ह्या भागात अपघात होत असल्याने नागरिक चिंताग्रस्त झाले आहेत.
error: Content is protected !!
WhatsApp us
Join WhatsApp Group