इगतपुरीनामा न्यूज – ७८ व्या स्वातंत्र्यदिन सुवर्णमुहूर्ताचे औचित्य साधून इगतपुरी तालुक्यातील टिटोली ग्रामपंचायतीतर्फे ग्रामनिधीतील ५ टक्के रक्कम गावातील दिव्यांग बांधवांना वाटप केली. २४ लाभार्थ्यांना प्रत्येकी २ हजार १५१ रुपयांचा धनादेश वाटप करण्यात आला. विजेते वेगळी गोष्ट करत नाहीत तर प्रत्येक गोष्ट वेगळ्या पद्धतीने करतात ह्या विचारधारेप्रमाणे माजि सरपंच तथा विद्यमान ग्रामपंचायत सदस्य अनिल भोपे यांची कल्पकता व अथक प्रयत्नातून टिटोली येथे आकर्षक भारतमाता सार्वजनिक सभामंडप उभारण्यात आलेले आहे. आपल्या कामांच्या आगळ्यावेगळ्या कामासाठी प्रसिध्द असलेल्या टिटोली ग्रामपंचायतीने जय जवान जय किसान सेल्फीपॉइंट नंतर आता सामाजिक, सार्वजनिक कार्यक्मात राष्ट्रप्रेमाचा संदेश सदैव स्मरणात राहण्यासाठी तिरंगा ध्वजाचे छत्र असणारे भारतमाता सार्वजनिक सभामंडप बनवले आहे. ऊन, वारा, पाऊस ह्यांपासून संरक्षण करणारे हे छत्र गुणवत्तापूर्ण, आकर्षक मांडणी आणि विशेष लक्षवेधी आहे. सर्वच स्तरातून ह्या कामाचे कौतुक केले जात आहे. आमच्यासाठी आमचे सर्वच ग्रामस्थ लाडके ग्रामस्थ आहेत. नेहमी आम्ही आमची जबाबदारी नि:स्वार्थपणे पार पाडायला कटिबध्द आहोत असे मनोगत टिटोली ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक व सर्व सदस्यांच्या वतीने अनिल भोपे ह्यांनी व्यक्त करून उपस्थितांचे आभार मानले.
Similar Posts
error: Content is protected !!
WhatsApp us
Join WhatsApp Group