
इगतपुरीनामा न्यूज : महाराष्ट्र भटक्या विमुक्त जाती संघ संचलित संजीवनी प्राथमिक माध्यमिक आश्रमशाळेत निवासी विद्यार्थ्यांसाठी जॉन्सन अँड जॉन्सन प्रायव्हेट लिमिटेड यांच्यातर्फे डोळ्यांची तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले होते. मुंबई येथील “जॉन्सन” प्लांटच्या ऑप्टोमेट्रिस्ट टीमकडून निवासी विद्यार्थ्यांसाठी या मोफत शिबिराचे आयोजन करण्यात आले.
जॉन्सनचे सहाय्यक व्यवस्थापक संतोष भांगे, ऑप्टोमेट्रिस्ट मनन गाला, प्रथमेश ससाने, प्रणव सप्नंदन यांच्यासह कृष्ण मोहन, पराग वाडेकर, तुषार करकेरा, समीर शिरसाठ, गौरांग भट, अमित वाळवे, संतोष पांचाळ, अजिंक्य तेलावणे, आलोक शुक्ला यांनी यावेळी आश्रम शाळेतील सुमारे दोनशे निवासी विद्यार्थ्यांच्या डोळ्यांची तपासणी केली. यापैकी ज्या विद्यार्थ्यांना चष्म्याची आवश्यकता आहे किंवा पुढील उपचारांची आवश्यकता आहे त्या सर्व विद्यार्थ्यांना चष्मा पुरवणार असून पुढील उपचारही पूर्णपणे मोफत करणार असल्याचे टीमने आवर्जून सांगितले.
मुख्याध्यापक मनोज गोसावी, दगुनाथ मोरे यांच्यासह शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यावेळी उपस्थित होते. यावेळी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निशिगंध पवार यांनी तर आभार प्रदर्शन अनिता जाधव यांनी केले.