
इगतपुरीनामा न्यूज – समनेरे, ता. इगतपुरी येथील माहेर असलेल्या २४ वर्षीय विवाहित युवतीने जवळच असणाऱ्या दारणा नदीच्या बॅकवॉटरमध्ये उडी मारून आत्महत्या केल्याची घटना आज उघडकीस आली. स्थानिक ग्रामस्थांनी घोटी पोलिसांना माहिती देताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तिचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी घोटी ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. आत्महत्येच्या कारणांचा घोटी पोलिसांकडून कसून शोध घेतला जात आहे. नेत्रा उर्फ हर्षदा शंकर गायकवाड वय २४ वर्ष असे आत्महत्या करणाऱ्या युवतीचे नाव आहे. समनेरे हे तिचे माहेर असून कोरपगाव येथे सासर आहे. ४ वर्षांपासून ती समनेरे इथेच राहत होती.